शालेय विद्यार्थीनींना पॅड वितरण करण्याची मागणी कन्हान शहर विकास मंच चे जिल्हाधिकारी मार्फत शिक्षण मंत्रींना निवेदन.

कन्हान : – राज्यात कोरोनाने थैमान घातल्याने शासना द्वारे संचारबंदी लागु करुन लाॅकडाऊन लावण्यात आ ल्याने सर्व शाळा बंद असल्यामुळे शासना कडुन विद्या र्थीनींना शिक्षणाकरीता कुठल्याही प्रकारची व्यवस्था न केल्याने विद्यार्थींनी अडीअडचणी चा सामना करित कापडाचा उपयोग करीत असल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिका-यानी मंच सचिव प्रदीप बावने यांचा नेतृत्वात जिल्हाधिकारी मा. रविंन्द्र ठाकरे यांच्या मार्फत शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांना निवेदन पाठवुन शालेय विद्यार्थीनींना पॅड वितर ण करण्याची मागणी केली आहे.
देशात, राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात व शहरात कोरोनाने थैमान घातल्याने शासना द्वारे संचारबंदी लागु करुन लाॅकडाऊन लावण्यात आल्याने सर्व शाळा बंद असल्यामुळे शासना कडुन विद्यार्थीनींना शिक्षणा करीता कुठल्याही प्रकारची व्यवस्था न केल्याने विद्या र्थींनी अडीअडचणी चा सामना करित मासिक पाळी दरम्यान कापडाचा उपयोग करीत असुन हेच कापड वारंवार धुवुन वापरत असल्याने विद्यार्थीनींना खुप त्रास सहन करावा लागत आहे. मागील काही वर्षा पुर्वी कन्हान शहरापासुन काही अंतरावर असलेल्या साटक गावात एक विद्यार्थींनी अशाच या परिस्थिती मध्ये कापडावर अभ्यास करून तोच कापड वारंवार धुवुन वाळवायला टाकले असता त्या कपड्या मध्ये “गोम” असल्याचे विद्यार्थीनी ला लक्षात न आल्याने
विद्यार्थिनीने तोच कापड लावल्यावर ती “गोम” विद्या र्थीनी च्या शरीरात गेली असता तिच्या शरीरात गोमाचे प्रमाण वाढल्याने तिच्या मृत्यु झाला. अश्या या परि स्थिती मध्ये शासनाने या गंभीर विषयाला लक्षात घेत दर महिन्याला शालेय माध्यमा द्वारे विद्यार्थीनींना पॅड वितरण करण्याची मागणी कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिका-यांनी मंच सचिव प्रदीप बावने यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी रविंन्द्र ठाकरे यांचा मार्फत शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांना निवेदन पाठवुन केली आहे. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंचचे उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, कोषाध्यक्ष हरीओम प्रकाश नारायण, सुषमा मस्के, पौर्णिमा दुबे सह मंच पदाधिकारी उपस्थित होते.