वैष्णवी शशांक हगवणे आत्महत्या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी संध्या सव्वालाखे यांनी दिले मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन

पुणे:- महाराष्ट्र प्रदेश महिला कॉग्रेसच्या वतीने आपणांस कळवावेसे वाटते की, दि. १६ मे २०२५ रोजी भुकूम, ता. मुळशी, जि. पुणे येथे राहणा-या वैष्णवी शशांक हगवणे या विवाहित महिलेने सासरच्या लोकांकडून होणा-या मानसिक, शारिरिक छळाला कंटाळून आत्महत्या केली, ही बाब अत्यंत गंभीर असून संतापजनक आहे.
वैष्यीच्या सासरकडील हगवणे कुटुबाने विवाहावेळी ५१ तोळे सोने, फॉर्च्यूनर कार आणि इतर महागड्या गोष्टी हुंडा म्हणून घेतल्या असूनही, तिच्यावर लग्नानंतरही सातत्याने छळ होत राहिला. विशेष म्हणजे या कुटुंबाचे काही सदस्य राजकीय पक्षाशी संबंधित असून त्यांच्या सामाजिक व राजकीय दबावामुळे चौकशीत अडथळे येण्याची शक्यता आहे.
या प्रकरणातः
१. दोर्षीवर कठोर व वेगवान कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.
२. फरार आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करावे.
३. प्रकारणाची सखोल, स्वतंत्र पारदर्शक चौकशी व्हावी.
४. पीडीतेच्या कुटुंबीयांना शासनामार्फत न्याय व मदत मिळावी.
अशा मागण्या आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने करत आहोत.
जर शासनाकडून या प्रकरणात तातडीने पावले उचलली गेली माहित, तर महिला काँग्रेस कडून आंदोलनात्मक मार्ग अवलंबण्यात होईल. या घटनेमुळे राज्यातील लाडक्या बहिणीमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
आपण या प्रकारणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना कराल, अशी अपेक्षा आहे.
अशा प्रकारचे निवेदन संध्या सव्वालाखे यांनी दिले आहे.