हेडलाइन

वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाच्या केंद्र सरकार व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत : डॉ. बबनराव तायवाडे

Summary

वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाच्या केंद्र सरकार व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत : डॉ. बबनराव तायवाडे       वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला मा. सर्वोच्च न्यायालयात मंजुरी २७% ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा.   गडचिरोली : ऑल इंडिया मेडीकल कोट्यात ओबीसींना […]

वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाच्या केंद्र सरकार व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत : डॉ. बबनराव तायवाडे

 

 

 

वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला मा. सर्वोच्च न्यायालयात मंजुरी २७% ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा.

 

गडचिरोली : ऑल इंडिया मेडीकल कोट्यात ओबीसींना २७% आरक्षण देण्याचा निर्णय दि. २९ जुलैला केंद्र सरकारने लागु केला होता. वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला मा. सर्वोच्च न्यायालयाद्वारे आज या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे. याबाबत केंद्र सरकार व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी स्वागत केले आहे. वेळोवेळी आंदोलन करून विविध ओबीसी चळवळी व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे हे मोठे यश असल्याचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी आज येथे सांगितले. या संदर्भात केंद्राने जुलै २०२१ मधे निर्णय घेतला होता. मात्र आज ( दि. ७ ) ला मा. सर्वोच्च न्यायालयानेही या निर्णयास मंजुरी दिली आहे. याचा लाभ राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना मेडीकलमधे प्रवेश मिळण्यासाठी होणार आहे. राज्यातील मेडीकल प्रवेशित ओबीसी विद्यार्थ्यांना युजी मधे १५% कोट्यात व पीजीमधे ५०% कोट्यात २७% आरक्षण सत्र २०२१-२२ पासून मिळणार आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, ,डॉ प्रकाश भागरथ ,प्रा.शेषराव येलेकर, प्रा. शरद वानखेडे, सुभाष घाटे,चेतन शिंदे, प्रदीप वादाफळे ,गुणेश्वर आरीकर, दिनेश चोखारे, श्याम लेडे, कल्पना मानकर,रजनी मोरे, , संजय पन्नासे ,शकील पटेल, राजकुमार घुले, वृंदा ठाकरे,अनिल नाचपल्ले, ईश्वर ढोले,गडचिरोली जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, सुखदेव जेंघटे,सचिव प्रा देवानंद कामडी , कोषाध्यक्ष डॉ सुरेश लडके,जिल्हा संघटक सुरेश भांडेकर, चंद्रकांत शिवणकर, प्रभाकर वासेकर, महीला शहर अध्यक्ष सोनाली पुण्यपवार आदींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

 

प्रा शेषराव येलेकर

विदर्भ चीफ न्यूज ब्युरो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *