गडचिरोली महाराष्ट्र हेडलाइन

वेलकम डे व शिक्षक दिन – २०२५ महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी येथे साजरा

Summary

चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथे वेलकम डे तसेच शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. […]

चामोर्शी तालुक्यातील
आष्टी येथे
दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथे वेलकम डे तसेच शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
बी.ए. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून वेलकम डेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामागील उद्देश प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाशी परिचय व्हावा, वरिष्ठ विद्यार्थ्यांशी आपुलकीचे संबंध प्रस्थापित व्हावेत आणि विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे हा होता.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील उपक्रमांत सक्रिय सहभाग घेऊन आपले कलागुण विकसित करावेत असे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाविषयीचा आपला अनुभव व भावना व्यक्त करून वातावरण अधिक उत्साही केले.
या कार्यक्रमाचे संचालन समीक्ष शेख (बी.ए. द्वितीय वर्ष) यांनी केले. प्रास्ताविक रोहित यांनी सादर केले तर आभार प्रदर्शन राजश्री गोंगले यांनी केले.
कार्यक्रमास सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. ज्योती बोभाटे, एनएसएस विभाग प्रमुख प्रा. रवी गजभिये, तसेच डॉ. शास्त्रकार, डॉ. कोरडे, डॉ. पांडे, डॉ. मुसने, डॉ. खूने, प्रा. गभने मॅडम आदी मान्यवर प्राध्यापक उपस्थित होते. महाविद्यालयातील सर्व कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित राहिले.
कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला.

पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
गडचिरोली चामोर्शी
प्रतिनिधी
गजानन पुराम
मो. 7057785181

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *