हेडलाइन

वेतनातून कपात झालेल्या रक्कमा शिक्षकांच्या कर्ज खात्याला पाठवा

Summary

प्रेसनोट वेतनातून कपात झालेल्या रक्कमा शिक्षकांच्या कर्ज खात्याला पाठवा __ प्रहार शिक्षक संघटनेची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आर्त हाक? चंद्रपूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे माहे मे 2022 चे वेतन zppfms प्रणाली ध्दारे शिक्षकांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात आले असून […]

प्रेसनोट

वेतनातून कपात झालेल्या रक्कमा शिक्षकांच्या कर्ज खात्याला पाठवा __ प्रहार शिक्षक संघटनेची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आर्त हाक? चंद्रपूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे माहे मे 2022 चे वेतन zppfms प्रणाली ध्दारे शिक्षकांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात आले असून व विविध बँका, शिक्षक सहकारी पतसंस्था यांच्या कर्जाची रक्कम गटशिक्षणाधिकारी यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्यात. परंतु शिक्षकांच्या वेतनातून मासिक कपाती गटशिक्षणाधिकारी यांच्या बँक खात्यात जमा होऊन कपातीची रक्कम शिक्षकांच्या बँक कर्ज खात्यावर बँकेकडे व शिक्षक सहकारी पतसंस्थेकडे न पाठविल्यामुळे व्याजावर चक्रवाढ व्याज बसत असल्याने तात्काळ कपातीची रक्कम तात्काळ जमा करावी यासाठी प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जयदास सांगोडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे निवेदन सादर करून आर्त हाक निवेदनातून करण्यात आली आहे.

 

Zpfms प्रणाली द्दारे माहे मे – 2022 चे वेतन मा.मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्याकडून थेट शिक्षकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले. तसेच शिक्षकांनी कर्ज स्वरूपात उचलेल्या शिक्षक सहकारी पतसंस्था ,बँक , एल. आय. सी व इतर कपातीची रक्कम गटशिक्षणाधिकारी यांच्या महाराष्ट्र बँक खात्यावर जमा करण्यात आलेल्या आहेत. गटशिक्षणाधिकारी यांनी त्या कपातीची रक्कम शिक्षकांच्या पतसंस्था , बँक, एल आय सी याकडे एक महिन्याचा कालावधी होऊन पाठविले नाही.गटशिक्षणाधिकारी यांच्याच बँक खात्यावर कपातीची 15 कोटी रुपये जमा आहेत.बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या विविध शाखेत शिक्षकांच्या वेतनातून कपात झालेल्या 15 कोटी रुपयांवर व्याज तर देणार नाही. परंतु शिक्षकांनी शिक्षक सहकारी पतसंस्था / बँक यांच्याकडून घेतलेल्या कर्जावर माञ चक्रवाढ व्याज आकारले जाईल. या संदर्भात प्रहार शिक्षक संघटना तालुका शाखा ब्रम्हपुरी च्या वतीने गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांना भेटून कपाती पाठविण्याची विनंती केली असता गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे उपलब्ध लिपिक कपातीचे रोकड वही व चेक लिहिण्यासाठी तयार नाहीत. त्यानंतर गटविकास अधिकारी, पंचायत समिती ब्रम्हपुरी यांनी सुध्दा लेखा विभागातील अधिकारी कर्मचारी मदत करण्यासाठी तयार असल्याचे मान्य करून शिक्षण विभागातिल लीपिकवर्गीय कर्मचारी कपातीचे हिशोब ठेवण्यास तयार नाही. हिच परिस्थिती संपूर्ण जिल्हातील पंचायत समिति मध्ये आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी याबाबत आपल्या स्तरावरून तात्काळ आदेश देऊन मे 2022 च्या वेतनातून कपात झालेल्या रक्कमा संबधित बँक,पतसंस्था व एल आय सी कडे पाठवून शिक्षकाच्या कर्ज रक्कमेवर चक्रवाढ व्याज आकारन्या पासून बचाव करावे अशी मागणी

जयदास सांगोडे, जिल्हा अध्यक्ष, विनोद लांडगे, जिल्हा सरचिटणीस, देवेंद्र रायपूरे, जिल्हा कार्याध्यक्ष, मुन्ना येरणे, होमेंद्र मेश्राम, प्रदिप टिपले, नागेश सुखदेवे, देवानंद तुलकाने, योगेश रामटेके, जयगुरू मेश्राम, आशा कारवटकर, आरती रामटेके, छाया जांभुळे यांनी निवेदाद्वारे केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *