वृद्ध सिंधुबाई आवारीना आज काय वाटले असेल……? त्यांचे अश्रू इथून मला दिसताहेत. – हेरंब कुलकर्णी.
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 27 मे. 2021.
चंद्रपूरला दारूबंदी व्हावी चिमुरहून १३५ किलोमीटर पायी नागपूरला महिलांनी म्हणून मोर्चा काढला. तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दारूबंदी बाबत काहीच बोलेना.. तेव्हा वृद्ध सिंधुबाई आवारी यांनी त्यांच्यासमोर पदर दूर करून आपली पाठ दाखवली आणि म्हणाल्या होत्या ” *आज मी तिसर्या पिढीचा मार खाऊन मोर्चाला आले आहे, लहानपणी माझ्या बापाने दारू पिऊन मला मारले. तरुणपणी दारू पिऊन नवरा लाथा घालायचा आणि आज मोर्चाला निघाले तर दारू पिलेल्या नातवाने पाठीवर वळ निघेपर्यंत मला मारलं, मरेपर्यंत आम्ही महिलांनी फक्त दारू डयांचा मारच खायचा का…? विजय वडेट्टीवार सांगा, दारुबंदी मागे घेतल्याने सिंधुबाईचा मार वाचणार आहे का ? व्यसन मुक्त समाजाच्या दिशेने पाऊल पुढे पडणार आहे का..?
आज वृद्ध सिंधुबाई ला काय वाटले असेल ? सिंधुबाई चा चेहरा आज मला इथून शेकडो किलोमीटरवरून इथून दिसतो आहे….