वीर शहिदांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण
नागपूर कन्हान : – १६ डिसेंबर १९७१ मध्ये झालेल्या भारत – पाकिस्तान च्या युद्धात भारता चे ३,९०० वीर जवान शहिद होऊन विजय पताका फळकविला होता. म्हणुन १६ डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणुन संपुर्ण देशात साजरा केला जातो.
कन्हान शहर विकास मंच व्दारे गांधी चौक कन्हान येथे बुधवार (दि.१६) ला शहिदांच्या प्रतिमेवर कन्हान पोलीस स्टेशनचे सपोनि अमितकुमार आत्राम यांच्या हस्ते माल्यार्पण, पुष्प अर्पित व दिप प्रज्वलित करून युद्धात शहिद झालेल्या वीर जवानांना भावपुर्ण श्रद्धां जली अर्पित करण्यात आली. याप्रसंगी मंच सचिव प्रदीप बावने हयानी विजय दिवसा निमित्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित सर्व मंच पदाधिकारी यांनी शहिदांच्या प्रतिमे वर पुष्प अर्पित करुन १६ डिसेंबर १९७१ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान च्या युद्धात शहिद झालेल्या वीर जवानांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी कन्हान शहर विकास मंच अध्य क्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, महासचिव संजय रंगारी, कुशाल रामटेके, राहुल रंगारी, हरीओम प्रकाश नारायण, सुषमा मस्के, पौर्णिमा दुबे, वैशाली खंडार, सोनु खोब्रागडे, अक्षय फुले, मुकेश गंगराज, प्रकाश कुर्वे, प्रविण माने, शाहरुख खान, शुभम मंदुर कर आदी मंच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
९५७९९९८५३५