‘वीर बालदिवस’ निमित्त सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे अभिवादन
मुंबई, दि २६ : वीर बालदिवस निमित्त सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज मंत्रालयात साहिबजादे बाबा जोरावार सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी विजय शिंदे, सहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव व मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
०००