BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

वीज कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात – बोनस नाही आणि दीड दिवसांचे वेतन कपात

Summary

राजकुमार खोब्रागडे/मुख्य संपादक नागपूर – इतरांच्या घरात उजळा पसरवणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांची स्वतःची दिवाळी मात्र अंधारमय ठरली आहे. राज्यातील सार्वजनिक ऊर्जा कंपन्या — महावितरण, महामार्गन आणि महाजेनको — यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना या आर्थिक वर्षासाठी (2024-25) ₹20,500 इतक्या सामूहिक अनुदानाचा (बोनसचा) प्रस्ताव […]

राजकुमार खोब्रागडे/मुख्य संपादक
नागपूर – इतरांच्या घरात उजळा पसरवणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांची स्वतःची दिवाळी मात्र अंधारमय ठरली आहे. राज्यातील सार्वजनिक ऊर्जा कंपन्या — महावितरण, महामार्गन आणि महाजेनको — यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना या आर्थिक वर्षासाठी (2024-25) ₹20,500 इतक्या सामूहिक अनुदानाचा (बोनसचा) प्रस्ताव दिला होता. मात्र, कंपनीच्या व्यवस्थापनाने हा प्रस्ताव मंजूर न करता बोनस न देण्याचा निर्णय घेतला आहे.

याशिवाय, कर्मचाऱ्यांच्या दीड दिवसांच्या वेतनाचीही कपात करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. महावितरण कंपनीने यापूर्वीच गेल्या महिन्याचे वेतनवाढीचे अंतिम हप्ता दिल्याचे सांगत, कंपनीची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे कारण देत बोनस थांबवला आहे.

सूत्रांनुसार, महाजेनको आणि महामार्गनच्या व्यवस्थापकीय संचालकांनी बोनस प्रस्तावास मंजुरी दिली असली, तरी महावितरण कंपनीने आर्थिक अडचणींचा दाखला देत बोनस देण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे वीज कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून त्यांची दिवाळी अक्षरशः अंधारात गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पूरग्रस्त आणि अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी आणखी एका दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार असल्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत.

वीज कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, “आम्ही इतरांच्या घरात प्रकाश पसरवतो, पण या वर्षी आमच्या स्वतःच्या घरातील दिवाळी मात्र अंधारात गेली.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *