वीजबिलांचा गोंधळ – नागरिक हैराण, संघटनेतर्फे तक्रार नोंदणीची मागणी
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) तर्फे अलीकडे दिलेल्या वीजबिलांमध्ये प्रचंड वाढ झाल्याची नागरिकांची तक्रार आहे. आधी ज्या ग्राहकांचे मासिक बील ₹500 ते ₹600 दरम्यान येत होते, त्यांचेच बिल अचानक ₹5000 ते ₹6000 पर्यंत पोहोचले आहे. या अचानक वाढीमुळे सामान्य जनता गोंधळलेली असून यात काहीतरी गंभीर त्रुटी अथवा भ्रष्टाचार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नव्याने बसवण्यात आलेल्या मीटर बोर्ड / स्मार्ट मीटर हे या वाढीचे मुख्य कारण असू शकते. तसेच नागपूर खंडपीठात या संदर्भात जनहित याचिकाही दाखल झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटना तर्फे नागरिकांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संघटनेचे प्रदेश महासचिव अमर वासनिक यांनी आवाहन केले आहे की –
> “ज्या नागरिकांचे वीजबिल अनावश्यकपणे वाढले आहे, त्यांनी आपल्या सर्व कागदपत्रांसह संघटनेच्या कार्यालयात येऊन तक्रार नोंदवावी. संघटनेमार्फत सामूहिक पातळीवर हा मुद्दा शासन व वीज वितरण कंपनीपुढे मांडला जाईल.”
संघटनेचे पदाधिकारी पुढील काळात RTI, सामूहिक निवेदन व आवश्यक असल्यास न्यायालयीन लढा उभारणार असल्याचेही सांगण्यात आले.
—
