विश्व बंजारा दिवस खरे मानकरी पद्मश्री रामसिंगजी भानावत साहेब आद्य क्रांतिकारक तथा समाज सुधारक
प्रासंगिक
विश्व बंजारा दिवस
खरे मानकरी
पद्मश्री रामसिंगजी
भानावत साहेब
आद्य क्रांतिकारक
तथा समाज सुधारक
पोलीस योद्धा वृत्तसेवा
वर्धा – जागतिक पातळीवरील समस्त बंजारा समुदाय हजारो वर्ष संस्कृती जपत असताना बंजारा समाजाला थोर महापुरुषांचे योगदान व त्यांच्या आत्म- समर्पणाची विसर पडली आहेत . अखंड बंजारा समाजाचे आद्यक्रांतिकारक तथा समाज- सुधारक पद्मश्री रामसिंगजी भानावत साहेबच आहेत . त्यांनी राज्य , देश , विदेशात जाऊन रोमा जिप्सी बंजारा समाजाचा शोध लावला आणि तिथूनच जागतिक विश्व बंजारा दिनाची स्थापना झाली . असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . एका सामान्य कुटुंबाला जन्मास आलेला बापू आज आपल्यात नसून त्यांचे कार्य आजही आपल्यात जिवंत आहे . ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची स्थापना करणारे महापुरुष आज वरून बघत असतील ऑल इंडिया बंजारा सेवा संघ काम करत असेल म्हणून परंतु खालील भुतलावर चित्र विचित्र पद्धतीने विभाजित झालेले दिसत आहे . खरा विश्व बंजारा दिवस तेव्हा साजरा होईल जेव्हा तमाम बंजारा समाज आपसातले हेवेदावे , अटीतटी बंधुता, भाईचारा जोपासून एकत्र येऊन कार्य करण्यास सुरुवात करतील. समाजातील अनेक बाबींचा आढावा घेत आजचा बंजारा समाज विखुरलेला दिसतोय .
आपापसात दोन भावांमध्ये दोन गट होताना दिसत आहे. किती गंभीर बाब आहे . समाजातील सुजाण नागरिकांनी व्यवस्थित पायाभरणी करून समाजाला एकाच छताखाली आणावे लागणार आहे . बंधू भगिनींना विनंती करण्यात येत आहे की आपण कौतुक त्यांचेच करा जे पात्र आहे . आजकालच्या स्पर्धात्मक युगात रोजचे एक संघ तयार होत आहे . विचारपूर्वक कळकळीची विनंती आहे की उघड्या डोळ्यांनी बघून सहन करण्यापेक्षा, विरोध न करता, चुकीच्या गोष्टीला कडकडून विरोध करा . बंजारा समाजाची सामाजिक पातळीवर समावेश करावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या थोर महापुरुषांची प्रतिमा आज पासून बंजारा समाजाने घराघरात लावावी हीच विश्व बंजारा दिनी अपेक्षा.
आज दि. ०८/०४/२०२२ रोजी जगातील समस्त बंजारा समाजाला विश्व बंजारा बंधू-भगिनींना हार्दिक
शुभेच्छा.
महेश देवशोध ( राठोड )
