विभागीय क्रीडा संकुलात फिजिओथेरपी कार्यशाळेचे आयोजन
Summary
नागपूर दि. 11 : आझादी का अमृत महोत्सव इंडिया 75 अंतर्गत जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. त्यानिमित्त फिजिओथेरपी कार्यशाळेचे आयोजन विभागीय क्रीडा संकुल येथे करण्यात आले. स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व देशभक्तांना नमन करून […]
नागपूर दि. 11 : आझादी का अमृत महोत्सव इंडिया 75 अंतर्गत जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. त्यानिमित्त फिजिओथेरपी कार्यशाळेचे आयोजन विभागीय क्रीडा संकुल येथे करण्यात आले.
स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व देशभक्तांना नमन करून त्यांच्या स्मरणार्थ संपूर्ण देशांमध्ये अमृतमहोत्सव केंद्र शासनाच्या निर्देशानुसार साजरा करण्यात येत आहे. विभागीय क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी विमला आर. यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले. तसेच खेड्यांमध्ये व दैनंदिन सरावामध्ये फिजिओथेरपीचे महत्व खेळाडूंना समजावून सांगितले.
क्रीडा विभागांतर्गत विविध खेळाचा सराव करणाऱ्या खेळाडूंची फिजिओथेरपी विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर यांचे तज्ज्ञ पथकामार्फत फिजिओथेरपी करण्यात आली. दुखापतीबाबत करावयाच्या व्यायामाचे योग्य मार्गदर्शन करण्यात आले. या फिजिओथेरपीचा 50 ते 60 हॅन्डबॉल क्रीडा प्रबोधनीचे खेळाडू, बॉक्सिंग, मैदानी व बॅडमिंटन खेळाडूंनी लाभ घेतला.
या कार्यक्रमाला संचालक क्रीडा व युवक सेवा नागपूर विभाग शेखर पाटील, फिजिओथेरिपी विभाग प्रमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंजली दमके, जिल्हा युवा अधिकारी उदयबिर यांची प्रमुख उपस्थिती होती.