BREAKING NEWS:
औरंगाबाद क्राइम न्यूज़ महाराष्ट्र हेडलाइन

विभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दड यांच्याकडून आढावा

Summary

औरंगाबाद, दि.10 (विमाका) विभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दड यांनी विभागीय दक्षता व नियंत्रण समिती, विभागीय जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम तसेच गावांची, वस्त्यांची व रस्त्यांच्या नावाबाबत आढावा घेतला. याबाबत गतीने कार्यवाही करा, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले. विभागीय आयुक्त […]

औरंगाबाद, दि.10 (विमाका) विभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दड यांनी विभागीय दक्षता व नियंत्रण समिती, विभागीय जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम तसेच गावांची, वस्त्यांची व रस्त्यांच्या नावाबाबत आढावा घेतला. याबाबत गतीने कार्यवाही करा, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक, पोलीस उपअधिक्षक, महानगरपालिका आयुक्त, मुख्याधिकारी, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, बैठकीचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे उपस्थित होते.

आढावा बैठकीत नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1995, अनु.जाती तसेच जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989, तसेच 1.4.1995 ते 30 जून,2023 अखेर  या कालावधीत घडलेल्या गुन्हयांचा आढावा घेण्यात आला.

औरंगाबाद विभागातील घडलेले एकूण गुन्हे तसेच त्यापैकी पोलीस तपासावरील एकूण गुन्हयांबाबत पोलीस स्तरावरील गुन्हा तत्काळ निकाली काढण्याबाबत तसेच विभागीय जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमजबजावणीबाबत जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याबाबत आढावा घेण्यात आला. जिल्हास्तरावर लवकरात लवकर जिल्हास्तर जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याबाबत आयुक्त श्री. राजेअर्दड यांनी निर्देश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *