विधानसभेत दिवंगत माजी सदस्यांना शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली
Summary
मुंबई, दि. 5 : दिवंगत माजी विधानसभा सदस्यांना विधानसभेत शोकप्रस्तावाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिवंगत रावसाहेब चांदोबा अंतापूरकर, विद्यमान राज्यसभा सदस्य राजीव शंकरराव सातव, माजी वि.स.स. सर्वश्री संजय वामन देवतळे, रामप्रसादजी विठ्ठलराव बोराडे, […]
मुंबई, दि. 5 : दिवंगत माजी विधानसभा सदस्यांना विधानसभेत शोकप्रस्तावाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिवंगत रावसाहेब चांदोबा अंतापूरकर, विद्यमान राज्यसभा सदस्य राजीव शंकरराव सातव, माजी वि.स.स. सर्वश्री संजय वामन देवतळे, रामप्रसादजी विठ्ठलराव बोराडे, माजी वि.स.स. व माजी मंत्री, सर्वश्री एकनाथ महादेव गायकवाड, गंगाधरराव मोहनरावजी देशमुख-कुंटुरकर, माजी वि.स.स. व माजी राज्यमंत्री श्री.शंकर सखाराम नम, माजी वि.स.स. व माजी उप मंत्री, सर्वश्री संभाजी हरी पवार, एकनाथराव पांडुरंग साळवे, केशवराव देवराव महिंद्रे-पाटील, हरिभाऊ रामराव बरकुले, आनंदरावजी तुकाराम वंजारी, रमाकांत शंकर मयेकर, दत्तात्रय उघडु महाजन, प्रकाशराव उत्तमराव डहाके, योगेंद्र रेशमा भोये, पास्कल जान्या धनारे, माजी वि.स.स. श्रीमती ज्योती सुरेश कलानी, माजी वि.स.स.श्रीमती लताबाई श्रीकृष्ण तांबे, यांच्या दु:खद निधनाबद्दल सभागृहामध्ये शोकप्रस्ताव मांडून दोन मिनीटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी तालिका अध्यक्ष श्री.जाधव यांनी सभागृहाच्या वतीने शोकभावना व्यक्त केल्या.