विधानसभा प्रश्नोत्तरे
Summary
पाथरी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी ५ कोटींची तरतूद – मंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. 18 : परभणी जिल्ह्यातील पाथरी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी […]
पाथरी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी ५ कोटींची तरतूद – मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 18 : परभणी जिल्ह्यातील पाथरी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.
पाथरी येथील बसस्थानकातील छताचे प्लास्टर कोसळून तीन महिला जखमी झाल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सुरेश वरपूडकर, अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला होता.
मंत्री श्री. भुसे म्हणाले, या घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर या जखमी महिलांच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती एसटी महामंडळाकडून करण्यात आली आहे. तसेच या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली असून लवकर काम सुरू करण्यात येईल.
0000