Summary
मुंबई, दि. 5 : विधानसभा सदस्य सर्वश्री भास्कर जाधव, दिलीप बनकर, कालिदास कोळंबकर आणि कुमारी प्रणिती शिंदे यांची विधान सभा तालिका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज या सदस्यांची निवड विधानसभेत जाहीर केली.