विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती जाहीर विधानसभा कामकाज
नागपूर, दि. 7 : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून येथे सुरुवात झाली. विधानसभा कामकाजासाठी तालिका अध्यक्षांची नियुक्ती अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी सभागृहात जाहीर केली.
विधानसभा तालिका अध्यक्षपदी सदस्य संजय शिरसाट, समीर कुणावार, चेतन तुपे आणि अॅड. यशोमती ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे अध्यक्ष अॅड नार्वेकर यांनी जाहीर केले.