BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

विधानसभा कामकाज : कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करणार  – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Summary

मुंबई, दि. 3 : कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी तपास सुरू असून रशेष शाह आणि एआरसी एडेलवेस कंपन्यांची सुध्दा चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. विधानसभा सदस्य अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून […]

मुंबई, दि. 3 : कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी तपास सुरू असून रशेष शाह आणि एआरसी एडेलवेस कंपन्यांची सुध्दा चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

विधानसभा सदस्य अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून नितीन देसाई यांच्या मृत्यूची अपघाती मृत्यू एवढीच चौकशी न करता ही चौकशी अधिक व्यापक करण्याची मागणी केली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नितीन देसाई हे खऱ्या अर्थाने मराठी माणसाला अभिमान वाटावे, असे व्यक्तिमत्व होते. अनेक राजकीय पक्षांना सुद्धा मोठ्या आयोजनात ते मदत करायचे. या हरहुन्नरी कलाकाराचे आपल्यातून निघून जाणे हे वेदनादायी आहे.

आता या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येत आहेच. शिवाय त्यांना कुणी फसविण्याचा प्रयत्न केला का किंवा त्यांचा स्टुडिओ ताब्यात घेण्याचा कुणी प्रयत्न करीत होते का, याचाही तपास करण्यात येईल. हा स्टुडिओ जतन करण्याबाबत कायदेशीर मत घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *