विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते भावली धरणाचे जलपूजन संपन्न
नाशिक दिनांक 29 जुलै 2021 (जिमाका वृत्तसेवा): इगतपुरी तालुक्यातील भावली धरण पूर्ण भरल्याने आज विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
जलपूजन प्रसंगी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, उपविभागीय अभियंता अरूण निकम, तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलीस निरीक्षक सुधाकर नागरे, गटविकास अधिकारी लता गायकवाड, शाखा अभियंता सुरेश जाचक, घोटी बाजार समितीचे संदिप गुळवे आदी उपस्थित होते.
भावली धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 1 हजार 434 दशलक्ष घनफुट असून भावली धरण क्षेत्रात आज अखेर 2 हजार 183 मिमी पाऊस झाला आहे. धरण पूर्णपणे भरल्याने आज जलपुजन करण्यात आले. या धरणातून आतापर्यंत 450 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी यावेळी दिली.