विधानभवनात ३ ऑगस्ट रोजी ‘समर्पण ध्यानयोग शिबिर’
मुंबई, दि. 5 : विधानमंडळाच्या सदस्यांसाठी 3 ऑगस्ट 2021 रोजी विधानभवनात सकाळी 11.00 ते दुपारी 1.30 या वेळेत मध्यवर्ती सभागृह येथे ‘समर्पण ध्यानयोग शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. शिवकृपानंद स्वामी यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली.