विद्यार्थ्यांनो व्यसनांचा मोह टाळा – पोलीस उपनिरीक्षक आगाशे. सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा

अर्जुनी /मोर दि. 26 जून हा दिवस जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो, या निमित्त अमली पदार्थ सेवन विरोधात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन सरस्वती महाविद्यालयात करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक आगाशे यांनी अमली पदार्थांच्या सेवनाने गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे,अनेक कुटुंब रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे अमली पदार्थांमुळे सामाजिक,आर्थिक व मानसिक दुष्परिणाम होतात. त्यामुळे अमली पदार्थापासून दुर रहा, असे मार्गदर्शन त्यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य जे. डी. पठाण यांनी समाजात विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या विरोधात प्रबोधन करावे. आपल्या कुटुंब व समाजात अमली पदार्थांविरोधात जण जागृती करावी, असा मोलाचा संदेश दिला. या कार्यक्रम प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक मारवाडे अर्जुनी/मोर. उपप्राचार्य एम.के. पालीवाल , पोलीस हवालदार सूर्यवंशी , बगडेरिया, धात्रक, बहेवार इ. प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्येक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. के. डब्ल्यू. कापगते यांनी केले, तर कार्येक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.काशिवार, धकाते व रा से यो पथकाचे सहकार्यें लाभले.