विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षतेचे धडे रस्ता सुरक्षा सप्ताहा चे कोंढाळी येथील ला. भु. कनिष्ठ महाविद्यालयात आयोजन
Summary
वार्ताहर- कोंढाळी आज दि.16/01/2023 रोज सोमवार ला लाखोटिया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोंढाळी येथे “रस्ता सुरक्षा सप्ताह ” अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य. गणेश शेंबेकर ,प्रमुख अतिथी विशांत नांदगाये (पोलीस उपनिरीक्षक,पोलीस चौकी खुर्सापार), निलेश भिलावे […]
वार्ताहर- कोंढाळी
आज दि.16/01/2023 रोज सोमवार ला लाखोटिया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोंढाळी येथे “रस्ता सुरक्षा सप्ताह ” अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य. गणेश शेंबेकर ,प्रमुख अतिथी विशांत नांदगाये (पोलीस उपनिरीक्षक,पोलीस चौकी खुर्सापार), निलेश भिलावे ( पोलीस पोलीस चौकी खुर्सापार)रस्ता सुरक्षा विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच रस्ता सुरक्षा विषयावर प्रश्न मंजूसा चे आयोजन प्रसंगी प्रश्नोंत्तरी समर्पक उत्तर देनार्या सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित पाहूने मंडळींचे हस्ते रस्ता सुरक्षा सप्ताह चे आयोजकांनी प्रमुख उपस्थितीतांचे हस्ते शालेय साहित्याने पुरस्कृत केले. या प्रसंगी उपमुख्याध्यापिका शालिनी इंगळे, जेष्ठ पर्यवेक्षक सुधीर बुटे, डॉ.निरंजन अंजनकर,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता दुर्गाप्रसाद पांडे, ब्रिजेश तिवारी यांची होती.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सडक सुरक्षा नियम विषयी प्रश्न विचारले व त्यांच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तरे मिळाली .ध्वनीक्षेपण समीर लोणारे,शुभम राऊत अवहाल लेखन व राहुल रक्षित, शैलेश चव्हाण यांनी केले.या कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.संचालन हरिष राठी आभार-रुपेश वादाफळे यांनी मानले.