विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देवुन, आरोग्य यंत्रणेने योग्य उपचार करावे:- आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे
तुमसर:- काल दि. २४ ऑगस्ट ला अन्नातुन विषबाधा झाल्याची घटना तुमसर तालुक्यातील येरली येथील आदिवासी आश्रमशाळा येथे घडली.
विषबाधीत सर्व विद्यार्थांना सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय, तुमसर येथे काल दाखल करण्यात आले.
काही विद्यार्थांना जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथे दाखल करण्यात आले. या घटनेची दखल घेत आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन आजारी विद्यार्थ्यांच्या तब्येतीची विचारपूस करत भेट घेतली.
रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणेला विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देवुन योग्य उपचार करण्याचे निर्देश आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांनी दिले.
अशी घटना पुन्हा घडता कामा नये या संबंधी उपाय योजना करण्याचा आणि दक्षता घेण्याचा सुचना प्रशासनाला आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांनी दिले.
विषबाधा झालेल्या संपूर्ण विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
या वेळी श्री. नानाभाऊ पंचबुद्धे, श्री. श्रीकांत जी वैरागडे, श्री. सागर जी गभणे, श्री. प्रदिप जी भरणेकर, श्री. राहुल जी रणदिवे आणि पदाधिकारी, नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.