नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

विठ्ठला-!विठ्ठला-!!विठ्ठला!!! हरी ओम विठ्ठला!!!!!, च्या जयघोषांने दुमदुमली अख्खी कोंढाळी नगरी……… स्वागत द्वार, तोरण, पताका, झेंडे आणि घरा घरांवर रोषणाई, नगरितील प्रत्येक द्वारा वर रांगोळीने सजवलेले संपूर्ण शहर

Summary

कोंढाळी : वार्ताहर         सर्व धर्मिय धर्मोत्सव नगरी कोंढाळी( ठवळेपुरा) येथील प्राचीन श्री विठ्ठल मंदिर देवस्थानाचे वतीने 02ते 09जानेवारी पर्यंत अखंड नाम संकीर्तन धर्मोत्सव चे आयोजन करण्यात आले आहे. या महाधर्मोत्सवा प्रसंगी 07जानेवारी ला दुपारी 12वाजता श्री […]

कोंढाळी : वार्ताहर
        सर्व धर्मिय धर्मोत्सव नगरी कोंढाळी( ठवळेपुरा) येथील प्राचीन श्री विठ्ठल मंदिर देवस्थानाचे वतीने 02ते 09जानेवारी पर्यंत अखंड नाम संकीर्तन धर्मोत्सव चे आयोजन करण्यात आले आहे. या महाधर्मोत्सवा प्रसंगी 07जानेवारी ला दुपारी 12वाजता श्री विठ्ठल मंदिर देवस्थाना येथुन
जबलपूर, सिवनी , छिंदवाडा ,दिल्ली आदिंचा राज्यात कलापथकां सह विशेष सजावटी –
झेंडे,उंट, घोडा,गो- माता
ब्रॉस बँड-आर्वी
,मोर- घोडा पथक,
बाहुबली हनुमान
, मंदिर ट्रॅक्टर साऊंड, श्री विठ्ठल मंदिर मंदीर भजन दिंडी, पुष्प वृष्टी /स्वागतवाहन,
कलश पथक
श्री माऊली पालखी (मंदिर),बग्गी/ओपन गाडी
लेझीम पथक, ढोल सह
तिगाव (मध्यप्रदेश भजन दिंडी), आदिवासी नृत्य
शिव शंकर- तांडव , अघोरी पथक* (विषेश आकर्षण),
50भजन मंडळे दिंड्या
तसेच सुमारे 35 ते 40 देखावे
बँड पथक कोंढाळी
दहा प्रकार चे देव देवतांचे देखावे ही या प्रसंगी विषेश आकर्षणात होते. श्री माऊली च्या पालखी चे हजारों भाविकांच्या उपस्थितीत कोंढाळी नगरीतुन ‌भव्यतम् पालखी धर्मोत्सवाचे जागो जागी स्वागत करण्यात आले. या धर्मोत्सव सोहळ्यात
पंचक्रोशीतील सहा हजारांहून अधिक भाविक सहभागी झाले. या प्रसंगी आबाल वृद्ध *विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हरी ओम विठ्ठलाच्या* जय घोषात तल्लीन झाले होते. श्री माऊली चे पालखी शोभायात्रे दरम्यान सहभागी झालेल्या भाविकांचे व श्री माऊली पालखीचे सर्व धर्मीय नागरिक व स्थानिक नगर पंचायत, सर्व राजकीय, सामाजिक,‌व्यापारी, मोटार वाहन संघटना, क्रीडा, शैक्षणिक , सांस्कृतिक, संघटना यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले.या सोबतच जागो जागी चहा, कॉफी, शाबुदाणा खिचडी, चॉकलेट, बिस्किटे ,फळे,केळी,लाडू, मिष्ठान्न, पेयजल, शरबती चे वितरण करण्यात आले.सायंकाळी सहा वाजता येथील श्री संत गुलाबबाबा आश्रमात श्री माऊलींच्या पालखी च्या मिरवणुकीची सांगता झाली. येथील प्राचीन विठ्ठल मंदिर संस्थेतर्फे 09 जानेवारी दुपारी 12वाजता रोजी अखंड नामसंकीर्तन महोत्सव‌ दरम्यान काल्याचे संकिर्तनाचे आयोजन असल्याची माहिती आयोजन समितीने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *