विज बिलात सुट द्या…. भाजपाचे निवेदन
संजय निंबाळकर/पूर्व नागपुर उपसंपादक
.. ऊर्जा मंत्री ना नितीन राऊत यांनी लॉक डाऊन च्या काळातील वीज बिलात 30 ते 20 टक्के सुट देण्याचे आश्वासन प्रसार माध्यमातून दिले होते त्या आश्वासनावर कायम राहून ऊर्जा मंत्र्यांनी दिलेल्या शब्दावर जागावे आणि वीज बिलात किमान 30 ते 20 टक्के तरी सुट द्यावी अशी मागणी भाजपा शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली
प्रभारी तहसीलदार रणजित दुसावार,प्रभारी उपअभियंता महावितरण कामठी उपविभाग विनोद गुबे यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले,अवास्तव विजबिल,मनमानी रीडिंगच्या विरोधात आणि ऊर्जा मंत्र्यांनी विजबिल सुट साठी जाहीर केलेले आश्वासन पूर्ण करावे या मागणी साठी देण्यात आलेल्या निवेदनाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व भाजपा शहराध्यक्ष संजय कनोजिया, कार्याध्यक्ष लाला खंडेलवाल, नगरसेविका संध्या रायबोले यांनी केले
यावेळी प्रभाग १५ तील सविता टेकाम, मंगला बर्वे,लिला रामटेके,शितल सोनावणे, सचिन खरोले,विमल बघेल,भारती कनोजे,बबिता पटले,निसार खान,सिता पटले, अर्चना यादव,अंकित बंसोड,बलराम पंडा, अजित शाहू,गोपाल नाग,अमन तिरपुडे, दिनेश खेडकर, रोहित मेश्राम, चंद्रभागा देशभ्रतार, रेखा नागदेवे,कनिजा बेगम आदी रहिवासी उपस्थित होते