वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आधुनिक वाचनालयाचे(ज्ञानार्जन केंद्राचे) काळाची गरज आमदार चरणसिंग ठाकूर : कोंढाळी ज्ञानार्जन केंद्राचे उद्घाटन
कोंढाळी – वार्ताहर
कोंढाळी नगर पंचायती च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोंढाळी ज्ञानार्जन केंद्रा (वाचनालय) चे उद्घाटन वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून द्वितीय सत्रात ‘वाचनातून व्यक्तिमत्व विकासा साठी ज्ञानार्जन केंद्राचे महत्त्व विषद करताना प्रशासक धनंजय बोरीकर यांनी सांगितले की वाचन हे व्यक्तिमत्व विकासास पुरक असून वाचनामुळे शब्दसंग्रह, लेखन कौशल्य, ज्ञानार्जन, सर्जनशीलता आणि विश्लेषणात्मक विचाराच्या विकासास मोठा हातभार लागणा असल्याचे नगरपंचायत कोंढाळी चे प्रशासक धनंजय बोरीकर
यांनी सांगितले. व्यक्तिगत विकास विषयक ग्रंथ, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, कविता, सेल्फ हेल्प बुक्स, नाविण्यता आणि सर्जनशीलता अशा विविध विषयांवर आज उत्कृष्ट ग्रंथ संपदा उपलब्ध आहे.
प्रत्येकाने त्याच्या आवडीनुसार ग्रंथांचे वाचन करावे. या वाचनाचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला फायदा तर होणारच त्याचबरोबर त्याच्यात अनेकरूपाने बदलही घडून येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उच्च शिक्षणासाठी आवश्यक नाव नविन उपक्रमांची पुस्तके उपलब्ध असल्या बाबद राबविल्यास अनेक विद्यार्थी वाचनाकडे वळू शकतील असेही त्यांनी सांगितले. डिजीटल माध्यमे आणि स्क्रीन टाईम अशा अनुषंगिक बाबींसदर्भात चिंता व्यक्त केली जात असतानाही लोक वाचनाकडे वळू लागले आहेत. सेल्फ हेल्प प्रकारातील विविध विषयांवरील पुस्तकांना अजूनही जगभरातून मोठी मागणी असल्याचे ज्ञानार्जन केंद्रा चे उद्घाटक काटोल विधानसभा मतदारसंघाचे कामदार (आमदार) चरणसिंग ठाकूर यांनी सांगितले. तसेच मुलींकरिताही अत्याधुनिक सुविधेचे ज्ञानार्जन केंद्र सुरू करण्याचे सांगितले.
या प्रसंगी माजी सभापती शेषराव चाफले,माजी जि प सदस्या पुष्पा ताई चाफले, प्रा देविदास कठाणे,बाल किसन पालीवाल, उत्तमराव गिरडकर, विशाल काळबांडे, किशोर गाढवे, मारोतराव बोरकर, शामराव तायवाडे, निखील जयस्वाल, मुन्ना सिंह सेंगर,आकाश जैन, प्रमोद चाफले, रोषणवाघाडे, मनोज गोरे, तसेच ज्ञानार्जन केंद्राचे सर्व अभ्यासार्थींची व नगर पंचायत चे रितेश श्रीनगरे नगर अभियंता , गौरव लोंदे कर अधीक्षक, (काल संचालन केलेले अधिकारी), करण घीचारिया- स्वच्छता निरीक्षक , सतीश कदम लेखापाल,हर्षल सोणार नगर अभियंता
पवन वैद्य लिपिक ,
वंदना जयपूरकर लिपिक,
विजय गेडाम लिपिक ,
पुरुषोत्तम इखर लिपिक,
नागोराव गौरखेडे लिपिक, यांचे सह गावातील युवक व नागरिकांची उपस्थिती होती.