वाचनालयामुळे मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो रोशन फुले
Summary
लाखांदूर :- लाखांदूर तालुक्यातील मौजा साखरा येथे बुद्ध पौर्णिमेच्या शुभ पर्वावर बुद्ध विहार प्रवेशद्वार तथा सार्वजनिक वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी समाज प्रबोधन कार्यक्रमाला उपस्थित जनसमूहास मार्गदर्शन करताना वाचनालय म्हणजे ज्ञानप्राप्तीचे केंद्र ज्यामुळे मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. आणि विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण होऊन […]

लाखांदूर :-
लाखांदूर तालुक्यातील मौजा साखरा येथे बुद्ध पौर्णिमेच्या शुभ पर्वावर बुद्ध विहार प्रवेशद्वार तथा सार्वजनिक वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी समाज प्रबोधन कार्यक्रमाला उपस्थित जनसमूहास मार्गदर्शन करताना वाचनालय म्हणजे ज्ञानप्राप्तीचे केंद्र ज्यामुळे मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. आणि विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण होऊन मनुष्य आपल्या व आपल्या समाजाच्या त्याच प्रमाणे समस्त मानव जातीच्या उत्थानासाठी कार्य करीत असतो. असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणातून सामाजिक कार्यकर्ता रोशन फुले यांनी केले.
दिनांक 8 मे 2025 ला मौजा साखरा येथे प्रज्ञाशील बुद्ध विकास मंडळ तथा समता सैनिक दल साखरा यांच्या संयुक्त विद्यमानाने आगामी बुद्ध पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बुद्ध विहार प्रवेशद्वार तथा सार्वजनिक वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी समाज प्रबोधनापर कार्यक्रम भीम क्रांतीचा बुलंद आवाज. प्रबोधनकार विकास राजा आणि संच या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करताना बौद्ध धर्म हा जागतिक धर्म असून माणसाला माणूस म्हणून जगण्याचं समता,न्याय व बंधुतेवर आधारित जगातील एकमेव धर्म आहे.ज्यामुळे माणसाच्या सर्वांगीण विकास होऊन माणूस विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारतो आणि बुद्धांनी दिलेल्या मार्गाचा अवलंब करून तृष्णेवर विजय प्राप्त करतो. ज्यांना लिहिण्या वाचण्यापासून वंचित ठेवण्यात आलं होतं अशा लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केलं. आज गावोगावात शेळ्यापाड्यात वाचनालयाची सुरुवात करून गोरगरीब विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्तीचे साधन आपण तयार करून दिले पाहिजे ज्यामुळे मुलांचं सर्वांगीण विकास होऊन ते स्वतःच्या प्रगतीचा मार्ग निवडतील. आणि अशा प्रबोधनात्मक कार्यामधून आपल्या महापुरुषांचे विचार आपल्या समाजासमोर सतत तेवत ठेवण्याचे कार्य प्रबोधनकार करत असतात. असे मत सामाजिक कार्यकर्ता रोशन फुले यांनी व्यक्त केले.
या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे उद्घाटक मा. डी. जे. शेंडे, दीपप्रज्वलन डॉ. केतन भिवगडे पशु वैद्यकीय अधिकारी, सत्कार मूर्ती मा. के. जे. शेंडे आयु. संगीता शेंडे, प्रमुख पावणे रामदास बडोले, प्रविण फुल्लुके, राजेश थुलकर, रक्षित मेश्राम आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्विते साठी प्रज्ञाशील बुद्ध विकास मंडळ तथा समता सैनिक दल साखरा त्याच प्रमाणे सर्व बचत गट ग्राम पंचायत साखरा आणि सर्व गावकरी मंडळींनी सहकार्य केले.