वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या संतोष राऊत यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट.
Summary
गणपूर ता.चामोर्शि जि.गडचिरोली येथे शेतकरी संतोष भाऊजी राऊत हे शेतात काम करत असतांना त्यांच्यावर वाघाने हल्ला केला त्यामध्ये त्यांचे निधन झाले असता त्यांच्या निवासस्थानी गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी सांत्वना भेट दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती सेल […]

गणपूर ता.चामोर्शि जि.गडचिरोली येथे शेतकरी संतोष भाऊजी राऊत हे शेतात काम करत असतांना त्यांच्यावर वाघाने हल्ला केला त्यामध्ये त्यांचे निधन झाले असता त्यांच्या निवासस्थानी गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी सांत्वना भेट दिली.
यावेळी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती सेल रजनीकांत मोटघरे, जिल्हा उपाध्यक्ष कांग्रेस कमिटी गडचिरोली नितेश गद्देवार, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतिश विधाते, पंचायत समिती सदस्य सुरेश परसोडे, सरपंच सुधाकर गद्दे, मृतकाचे वडील भाऊजी राऊत, मृतकाची पत्नी पुष्पाताई राऊत, मुलगा मुन्ना राऊत, मुलगी प्रियांका राऊत, संजय राऊत, संजय मुत्तालवार, जनार्धन सानार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.