वरोरा विधानसभा राष्ट्रवादी कांग्रेसचा भारत बंदला पाठींबा
दिनांक 26/03 /2021 ला सयुक्त किसान मोर्चा या बैनर खाली 500 पेक्षा जास्त संघटना एकत्रित येऊन दिल्लीच्या सिमेवर सुरू असलेल्या शेतकरी बांधवांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी एकत्र येऊन शांततामय मार्गाने आंदोलन केलेले होते. यात केंद्र सरकारने केलेले काळे कृषि कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करित आहे .आतापर्यंत या आंदोलनात 300 च्या वर शेतकऱ्यांचे बळी गेलेले आहेत.
केन्द्रातिल भाजपच्या सरकारने सार्वजनिक सम्पत्ति विक्री करणारे जनविरोधी निर्णय घेतलेले आहे. ईंधन व गॅस सिलेंडर च्या झालेल्या प्रचंड दर वाढीने सर्व सामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे . कामगार कायद्यतिल बदलामुळे कामगार देशोधड़ीला लागले आहेत. या सर्व बाबींना विरोध करण्यासाठी विधानसभा क्षेत्राच्या वतीने येथे दिल्ली येथे सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आन्दोलनाला वरोरा विधानसभा राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे वतीने पाठींबा देण्यासाठी मा, उपविभागीय अधिकारी शिंदे साहेब यांचे मार्फत मा.पंतप्रधान नरेन्द्रजी मोदी साहेब यांना निवेदन देण्यात आले . या वेळी विलासराव नेरकर, अध्यक्ष वरोरा विधानसभा क्षेत्र, बंडूजी डाखरे कार्याध्यक्ष ओबीसी सेल चंद्रपुर , राजेंद्रजी वरघणे माजी शहर अध्य्क्ष वरोरा , अतुल वानखेड़े अध्य्क्ष समाजिक न्यायविभाग वरोरा , ईश्वर सुर , मंगेश दातारकर , नगाजी निंबाळकर,संघटक राष्ट्रवादी कांग्रेसपक्षाचे कार्यकर्ते उपस्थिति
होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535