वरोरा तालुक्यातील गावकऱ्यांची मागणी . वरोरा तुमगाव जामखुला ही बस नागरीपर्यंत सुरू करण्याबाबत जामखुला येथील रहिवाशांची पालकमंत्र्याकडे मागणी
शेषराव येलेकर / सह संपादक
खेड्यापाड्यातील लोकांना महसुलीची कामे, बाजारपेठेसाठी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा साठी एसटी महामंडळाची बस ही सर्वांच्या जिव्हाळ्याची सुविधा आहे. मागील पाच वर्षांपूर्वी वरोरा मांगली, उमरी, तूमगाव, आजणगाव , जामखुला , नागरी या गावातील लोकांना वरोरा / हिंगणघाट या महसुलीच्या व बाजारपेठेच्या ठिकाणी जाण्यासाठी वरोरा – जामखुला – नागरी ही बस सोयीस्कर रित्या सेवा देत होती. परंतु मागील पाच वर्षापासून ही बस फक्त जामखुला पर्यंत आणि तीही फक्त शाळेच्या दिवशीच सुरू असल्यामुळे या भागातील लोकांना वरोरा किंवा हिंगणघाट येथे जाण्यासाठी दुसरी सुविधा नसल्यामुळे त्यांचे अतोनात हाल होत आहे.तरी वरोरा – तूमगाव – जामखुला ही बस नागरीपर्यंत आणि तीही बारमाही सुरू करण्यात यावी अशी विनंती चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना या भागातील रहिवाशांनी केली आहे.
शेषराव येलेकर
सह संपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क