वरळी येथील शासकीय वसतिगृहांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १० : मुंबई शहर जिल्ह्यात सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयांतर्गत वरळी येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतीगृह व संत मिराबाई मुलींचे शासकीय वसतिगृह या वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया १५ जून २०२५ पासून सुरू होणार आहे. या वसतिगृहाच्या प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनिता मते यांनी प्रसिद्धी प्रत्रकाद्वारे केले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी https://hmas.mahait.org या प्रणालीवर १५ जून २०२५ पासून सुविधा सुरू होणार आहे. तरी मुंबई शहर जिल्हा अधिनस्त वरळी येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org प्रणालीवर अर्ज भरावेत असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
****