वरठी हनुमान वार्ड येथील रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

प्रतिनिधी वरठी:- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यामध्ये वरठी नावाचे गाव आहे. या गावामध्ये हनुमान वार्ड असून या वार्ड मध्ये प्रभु रामचंद्राचे भव्य मंदिर आहे. परन्तु मंदिराकडे जाणारा मार्ग(रस्ता) हा गेली पाच वर्षे ओबढ-ढोबड असून रस्ता खाच-खळगेंनी व्यापला आहे. याबद्दल हनुमान वार्ड येथील सामाजिक कार्यकर्ते तुमसर विधानसभा चे माननीय आमदार राजुभाऊ कारेमोरे यांना वारंवार फोन करून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करतात. परंतु आमदार महोदय ‘हो’ असे म्हणून वरठी ग्रामपंचायत ला निर्देश देण्याचे वचन देतात. परंतु रस्ता काही दुरुस्त केला जात नाही. त्यामुळे मंदिरात प्रभु रामचन्द्र तसेच भाविकांचे इष्टदेवत यांचे दर्शन घ्यायला जाताना त्रासाला तोंड द्यावे लागते. कित्येकदा या रस्त्यामध्ये अपघात सुद्धा घड़तात. परंतु वरठी येथील महिला सरपंच सौ. स्वेताताई येळने याकड़े दुर्लक्ष करीत आहेत. हनुमान वार्ड येथील रस्ता हा आमदार निधीतुन दुरुस्त करण्यात यावा हीच हनुमान वार्ड येथील नागरिकांची मागणी आहे.