वरठी येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जनजागृती शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी वरठी
दिनांक ०८-०८-२०२३ रोजी मंगळवार सकाळी ११:०० वाजता सार्वजनिक सभागृह ग्रामपंचायत कार्यालय सुभाष वॉर्ड मौजा वरठी येथे
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जनजागृती शिबिराचे आयोजन
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भंडारा जिल्ह्याचे मोहाडी तालुका कार्यक्रम समन्वयक अमर वासनिक यांनी केले असून
प्रस्तुत कार्यक्रम शिबिरामध्ये उत्पादन व सेवा क्षेत्रातील उद्योग स्थापन करण्यास अनुक्रमे रुपये ५० लक्ष व रुपये १० लक्ष प्रकल्प किमतीपर्यंत राज्य शासनाचे आर्थिक सहाय्य तसेच जिल्हा उद्योग केंद्र भंडारा यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध योजना आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येत असून केंद्रीय सूक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे चालविण्यात येणाऱ्या या उत्पादन व सेवा उद्योग रोजगारासाठी नवीन संधी विषयी दोन तासांचा जनजागृती कार्यक्रम शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे.
प्रस्तुत कार्यक्रम शिबिरामध्ये भंडारा जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी आणि खादी व ग्रामोद्योग मंडळ भंडारा जिल्हा कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भंडारा जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी कु. काजल राठौड़ मैडम, एम.सी.ई.डी. भंडारा चे पुस्तपालन व लेखाकर्म अधिकारी श्रीमती सौ. संगीता चव्हाण तसेच संबंधित अधिकारी व प्रमुख पाहुणे मंडळी उपस्थित राहणार असून सर्व गावकरी लोकांची उपस्थिती ही प्रार्थनीय असल्याचे कळविण्यात येत आहे.
तरी दिनांक ०८ ऑगस्ट रोज मंगळवारला आपण सर्व गावकरी मंडळी यांनी सुभाष वॉर्ड येथील सार्वजनिक सभागृह ग्रामपंचायत कार्यालय वरठी येथे उपस्थित राहाल अशी विनंती श्री अमर वासनिक रा. आंबेडकर वॉर्ड, वरठी यांनी केली आहे.