आर्थिक औद्योगिक भंडारा महाराष्ट्र रोजगार हेडलाइन

वरठी येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जनजागृती शिबिर संपन्न

Summary

प्रतिनिधी वरठी     काल दिनांक ०८-०८-२०२३ रोजी मंगळवार सकाळी ११:०० वाजता सार्वजनिक सभागृह ग्रामपंचायत कार्यालय सुभाष वॉर्ड मौजा वरठी येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रस्तुत कार्यक्रम शिबिर हे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भंडारा जिल्ह्याचे मोहाडी […]

प्रतिनिधी वरठी
    काल दिनांक ०८-०८-२०२३ रोजी मंगळवार सकाळी ११:०० वाजता सार्वजनिक सभागृह ग्रामपंचायत कार्यालय सुभाष वॉर्ड मौजा वरठी येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रस्तुत कार्यक्रम शिबिर हे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भंडारा जिल्ह्याचे मोहाडी तालुका कार्यक्रम समन्वयक अमर वासनिक यांनी केले होते. प्रस्तुत कार्यक्रम शिबिरामध्ये जिल्हा उद्योग केंद्र जिल्हा भंडाराचे महाव्यवस्थापक मा. श्री. बदर सर व महिला अधिकारी तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र जिल्हा भंडारा चे प्रकल्प अधिकारी मा. कु. काजल राठोड मॅडम आणि मोहाडी येथील महिला बचत गट समूहाचे अध्यक्ष मा. श्रीमती सौ अंजना धांडे हे उपस्थित होते. प्रस्तुत शिबिरामध्ये जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक मा. श्री. बदर सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच शिबिरामध्ये उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे समाधान करून दिले.
प्रस्तुत कार्यक्रम शिबिरामध्ये उत्पादन व सेवा क्षेत्रातील उद्योग स्थापन करण्यास अनुक्रमे रुपये ५० लक्ष व रुपये २० लक्ष प्रकल्प किमतीपर्यंत राज्य शासनाचे आर्थिक सहाय्य तसेच जिल्हा उद्योग केंद्र भंडारा यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध योजना आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येत असून केंद्रीय सूक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे चालविण्यात येणाऱ्या या उत्पादन व सेवा उद्योग रोजगारासाठी नवीन संधी विषयी माहिती मा. श्री. बदर सर यांनी दिली. प्रस्तुत शिबिरामध्ये प्रकल्प अधिकारी मा. कु. काजल राठोड यांनी उत्पादन तसेच सेवा क्षेत्रातील विविध उद्योगांची माहिती दिली. त्याचप्रमाणे संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या एकूण १६ निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती काजल राठोड मॅडम यांनी दिली. प्रस्तुत १६ निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रम हे भंडारा जिल्हा येथील महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र तर्फे आयोजित केले असून जिल्हा उद्योग केंद्र जिल्हा भंडारा तर्फे प्रायोजित असल्याची माहिती काजल राठोड मॅडम यांनी दिली. त्याचप्रमाणे सीएमईजीपी योजने मार्फत काही उपस्थितांची फॉर्म सुद्धा सबमिट करण्यात आले. ज्यांना पात्र लाभार्थींना अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी जिल्हा उद्योग केंद्र भंडारा किंवा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भंडारा कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन शिबिरात करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *