वरठी पोलीस पत्रकाराचे बयान घेण्यासाठी वापर करत आहेत दबावतंत्र
प्रतिनिधी मोहाडी:- प्राप्त माहितीनुसार पोलीस योद्धा न्युज नेटवर्क मध्ये दिनांक 17 जुलै 2021 रोजी ‘जेमतेम 60 अवैध धंदे वरठी येथे जोमात’ या शीर्षकाखाली बातमी आम्ही प्रकाशित केली होती. प्रस्तुत बातमी महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयात वाचली गेली म्हणून संतप्त वरठी पोलिसांनी त्या पत्रकाराला वारंवार समन्स पाठवणे चालू केले आहे. व त्या पत्रकारावर त्याचे बयान घेण्यासाठी साम दाम दंड भेद नितीशास्त्राचा वापर भंडारा एस डी पी ओ मार्फत केला जात आहे. यामध्ये वरठी पोलीस पत्रकारावर त्याचे बयान घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. यामध्ये वरठी पोलीस स्टेशन चे नव्याने नियुक्त ठाणेदार निशांत मेश्राम यांचा विशेष वाटा असून या बयानामध्ये प्रश्न विचारले जातात की तुम्ही या अवैध धंदे वाल्यांना ओळखता काय? तुम्ही यांना केव्हांपासून ओळखता? तुम्हाला या 60 अवैध धंदे वाल्यांची नावे कुठून मिळाली? तुमचे यांच्यासोबत काय संबंध आहेत? अश्याप्रकारे अवैध धंदे वाल्यांवर कोणतीही कार्यवाही न करता पत्रकाराचे उलट सुलट मार्गाने उलटे सुलटे बयान घेण्याचे षडयंत्र वरठी पोलीस करीत आहेत. व त्यावर जबरदस्तीने स्वाक्षरी घेण्याचे षडयंत्र वरठी पोलीस करीत आहेत. वरठी येथील अवैध धंद्यांवर कार्यवाही ही शून्य आहे.
