वरठी पोलिसांचा थरार! मध्यरात्री ‘प्रियंका’ पेट्रोल पंपाजवळ ५ हायप्रोफाईल टिप्पर जेरबंद दोन कोटींचा मुद्देमाल अन् ५० ब्रास रेती जप्त; वाळू माफियांवर खाकीचा सर्जिकल स्ट्राईक!
वरठी (प्रतिनिधी):
भंडारा जिल्ह्यात रेती माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी वरठी पोलिसांनी मध्यरात्री एक मोठी कारवाई केली आहे. मौजा बोथली परिसरातील प्रियंका पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी सापळा रचून तब्बल २ कोटी ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या धाडसी कारवाईमुळे रेती तस्करी करणाऱ्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
🎥 असा रंगला मध्यरात्रीचा थरार!
१६ मार्च २०२६ रोजी रात्री १० ते ११:३० च्या दरम्यान, वरठी पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना विनापरवाना रेती वाहतुकीची माहिती मिळाली. बोथली शिवारात पोलिसांनी पाळत ठेवली असता, एकामागून एक पाच अजस्र १२ चक्का टिप्पर सुसाट वेगाने येताना दिसले. पोलिसांनी या गाड्यांना अडवून तपासणी केली असता, विनापरवाना रेतीची चोरी करून वाहतूक होत असल्याचे उघड झाले.
🚜 जप्त मुद्देमाल आणि आरोपी:
प्रत्येकी टिप्परमध्ये १० ब्रास याप्रमाणे एकूण ५० ब्रास रेती (किंमत ३ लाख रुपये) आणि सुमारे २ कोटी रुपये किमतीचे पाच मोठे टिप्पर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहेत.
अटकेतील आरोपी:
१) हिवराज बारई (बासोरा, भंडारा)
२) मोहन उके (टाकळी पुनर्वसन)
३) नितेश वरकडे (दिघोरी, आमगाव)
४) दिनेश मस्के (चिचोली, नागपूर)
५) मंगेश हलमारे (बासोरा, भंडारा)
⚖️ कायद्याचा बडगा: गुन्हा दाखल
या पाचही आरोपींनी संगनमत करून शासनाचा महसूल बुडवून रेतीची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी वरठी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शेंडे अत्यंत वेगाने करत असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खाकीचा इशारा: “शासनाची संपत्ती चोरणाऱ्यांना सोडणार नाही, ही तर फक्त सुरुवात आहे!”
दरम्यान जप्त मालाची फोटो तपासी अधिकारी श्रेणी पोलिस उपनिरीक्षक शेंडे यांच्याकडे उपलब्ध नसल्याचे पत्रकाराशी बोलताना सांगितले.
वृत्तसंकलन:
अमर वासनिक
न्यूज एडिटर, पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
