वरठी (ता. मोहाडी) येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांची कारवाई; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

वरठी (ता. मोहाडी) :
६ जुलै २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता वरठी पोलिसांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर मोठी कारवाई केली. पाचगाव (ता. मोहाडी, जि. भंडारा) येथील सूर नदीपात्रातून रेतीची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ट्रॅक्टर चालक/मालक महेप नरेश कळंबे (वय ३५, रा. पाचगाव, ता. मोहाडी, जि. भंडारा) याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी निळ्या रंगाचा स्वराज ७४४ कंपनीचा ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच. ३६/ए.एल. १८४७, इंजिन नंबर EZ4001/SFE18303, चेसिस नंबर MBNBU53AAPTE62594) आणि विना क्रमांकाची निळ्या रंगाची ट्रॉली असा एकूण ६,००,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ट्रॉलीमध्ये एक बास रेती आढळून आली, ज्याची किंमत अंदाजे ६,००० रुपये आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ६,०६,००० रुपये इतकी आहे.
या प्रकरणी फिर्यादी प्रवीण बाबाराव पाटील (वय ४३, नेमणूक – स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा) यांच्या तक्रारीवरून वरठी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक २२५/२०२५ नुसार विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार ९५९/खापर्डे करीत आहेत.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या अवैध रेती वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ वरठी पोलीस स्टेशनशी ९३२५१७५२५६ या क्रमांकावर संपर्क साधावा.