वरठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली भविष्य निर्वाह निधी ( GPF )ची रक्कम त्वरीत त्याच्या GPF च्या खात्यात भरण्यात यावी : – रवि येळणे

आज वरठी ग्रामपंचायतच्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधीची रक्कम संबंधाने पोलीस स्टेशन वरठी येथे तक्रार दाखल केली
या तक्रारीच्या अनुषंगाने वरठी ग्रामपंचायत तर्फ कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय खालील प्रमाणे असल्याचे निदर्शनास येते
वरठी ग्रा पं च्या 20 ते 22 कर्मचाऱ्याचे भविष्य निर्वाह निधी मधे भरण्या करीता ग्रा पं 1090 रू कर्मचाऱ्या च्या पगारा मधून दर महिन्याला कपात करते आणि ग्रा पं तर्फ 1090 रू भविष्य निर्वाह निधी च्या खात्यामधे भरले जायचे .
पैसे च्या अभावी ग्रा पं मार्फत नेहमीच कर्मचाऱ्यांचा 3/4 महिन्यचा पगार थहीत थेवला जातो हे नेहमीचे ऐकून होतो .
परंतू मागील 33 महिन्या पासून कर्मचाऱ्यांच्या पगारा मधून दरमहा कपात केलेले 1090 रू कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात भरले गेले नाही , ही अतिशय धक्कादायक आणि गंभीर बाब उघडकीस आली आहे .
या दरम्यान मागील 8/9 महिन्यात 4 कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यांना अद्याप भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळू शकले नाही .
एक कर्मचारी मरण पावला त्याचे पैसे 15 दिवसात देन्या संबंधाने ग्रा पं ने पत्र दिले .
मग या पुढे कर्मचाऱ्यांना
आपले पैसे मिळवून घेन्यासाठी ग्रा पं ने एक च पर्यय बाही ठेवला आहे का ?
या र्सव कर्मचाऱ्याचे कपात केलेले लाखो रू ग्रा पं वरठी ने कुठे खर्च केले ?
या रकमे पोटी बँकेकडून मिळणारा व्याजाची भरपाई ग्रा पं कसी आणि कुठून करणार ?
असे बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत .
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर अशा अन्याय का करत आहे
विनती आहे कर्मचाऱ्यांच्या संयमाची परीक्षा न घेता
ग्रामपंचायत वरठी ने प्राधान्याने या विषया कडे लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर कारवाई करावी ही विनंती 🙏
आपला :- रवि येळणे