क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

वरठी ग्रामपंचायतीचा ‘माहिती’ लपवण्याचा बनाव? भ्रष्टाचाराच्या प्रश्नांवर उत्तरे देण्याचे टाळून पत्रकारांना दाखवला RTI चा रस्ता!

Summary

वरठी (प्रतिनिधी): वरठी ग्रामपंचायतीमधील १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग आणि विकासकामांच्या दर्जाबाबत ‘पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क’ने विचारलेल्या थेट प्रश्नांना उत्तर देण्याचे प्रशासनाने जाणीवपूर्वक टाळले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्याऐवजी, प्रशासनाने “माहिती अधिकार (RTI) अंतर्गत अर्ज करा” असा तांत्रिक सल्ला […]

1-3968×2976-1-0#

वरठी (प्रतिनिधी):
वरठी ग्रामपंचायतीमधील १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग आणि विकासकामांच्या दर्जाबाबत ‘पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क’ने विचारलेल्या थेट प्रश्नांना उत्तर देण्याचे प्रशासनाने जाणीवपूर्वक टाळले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्याऐवजी, प्रशासनाने “माहिती अधिकार (RTI) अंतर्गत अर्ज करा” असा तांत्रिक सल्ला देऊन आपली जबाबदारी झटकल्याचे समोर आले आहे.

​काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी ‘पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क’चे संपादक अमर वासनिक यांनी वरठी ग्रामपंचायतीला एक अधिकृत सूचनापत्र दिले होते. त्यामध्ये गावातील सिमेंट रस्ते, नाली बांधकाम आणि साहित्याच्या खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्याबाबत स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, यावर पारदर्शक उत्तर देण्याऐवजी ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेले उत्तर हे संशयास्पद असून, भ्रष्टाचार दडपण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

​प्रशासकीय हुकूमशाहीची भीती:
यापूर्वी माहिती अधिकारात माहिती घेताना पत्रकारांचे मोबाईल जप्त करणे, त्यांना धमकावणे आणि अर्धवट माहिती देऊन बळजबरीने स्वाक्षऱ्या घेणे, समाधान झाले म्हणून स्वाक्षऱ्या घेणे, माहिती निरीक्षणात अर्जदाराला गुमराह करणे, असे प्रकार वरठी ग्रामपंचायतीत घडले आहेत. आता पुन्हा एकदा माहिती अधिकाराचा रस्ता दाखवून तक्रारदाराला मानसिक त्रास देण्याचा हा कट असल्याचे अमर वासनिक यांनी म्हटले आहे.

​पुढील पाऊल:
या प्रशासकीय मुजोरीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि माहिती आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, लवकरच या प्रकरणाचा पाठपुरावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *