भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

वरठी उड्डाण पुलाजवळ एसटी बस रस्त्याच्या कडेला उतरली सुदैवाने ३५ प्रवासी बचावले भंडारा तुमसर मार्गावर अपघाताची मालिका सुरूच

Summary

मोहाडी:-            प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष भंडारा मोहाडी तुमसर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून दिनांक ०५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०५:३० वाजता दरम्यान प्रवासी घेऊन भंडारा कडे येणाऱ्या एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस वरठी उड्डाण पुलाजवळ […]

मोहाडी:-
           प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष भंडारा मोहाडी तुमसर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून दिनांक ०५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०५:३० वाजता दरम्यान प्रवासी घेऊन भंडारा कडे येणाऱ्या एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस वरठी उड्डाण पुलाजवळ रस्त्याच्या कडेला उतरली यात एसटी बसमधील ३५ प्रवासी सुदैवाने बचावले. या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जा मिळूनहीं दोन वर्षांपासून रस्त्याचे बांधकाम रखडलेले आहे. याकडे मात्र प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असून चुप्पी साधून आहेत.
          भंडारा आगाराची एसटी बस क्रमांक एम एच १२ इ एफ ६८५५ ही प्रवासी घेऊन कांद्री येथे गेली होती. कांद्री येथून प्रवासी घेऊन परतीच्या मार्गावर असताना वरठी उड्डाणपूला जवळ चालक सुरेश मल्लेवार याचे एसटी बस वरील नियंत्रण सुटल्याने एसटी बस रस्त्याच्या कडेला उतरली. यात मात्र कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून एसटी मधील ३५ प्रवाशांचे जीव सुदैवाने बचावले. याची माहिती वरठी पोलिसांना व भंडारा आगार परिवहन महामंडळाला मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन क्रेनच्या मदतीने एसटी बस रस्त्यावर काढली. एसटी मधील प्रवासी बाल बाल बचावल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. या महामार्गावर मागील अनेक दिवसांपासून अपघाताची मालिका सुरू असताना प्रशासनासह लोकप्रतिनिधी रस्त्याच्या बांधकामाकडे तसेच रस्त्यावरील खड्ड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांसह प्रवाशांत तसेच वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या मार्गावरून तिरोडा येथील अदानी कंपनीत कोळसा वाहून नेणारे अतीक्षमतेचे तसेच रेती वाहतूक करणारे ट्रक सुसाट धावत असल्याने लहान वाहनधारकांना वाहतुकीसंबंधी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याकडे मात्र परिवहन विभागाचे तसेच पोलीस विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. सदर महामार्गाच्या बांधकामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन बांधकामाला सुरुवात करावी. अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

चालकांनो सावधान मद्यपान करून बस चालवाल तर होणार कार्यवाही
आदेश धडकले
भंडाऱ्यात अंमलबजावणी सुरू

         बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अनेकदा बसचे चालक हे मद्य प्राशन करून बस चालवत असल्यामुळे अपघात घडत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडे प्राप्त होत असल्याने त्याची दखल घेत सदर प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्यातील सर्व बस स्थानकांजवळ चालकांची ‘ब्रीथ अनालायझर अल्कोहोल मशीन’ च्याद्वारे तपासणी करण्याचे मध्यवर्ती कार्यालयाचे जिल्हानिहाय कार्यालयाला आदेश धडकल्याने भंडारा येथील एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आदेशाचे पालन करीत कर्तव्य बजावणाऱ्या चालकांची बसस्थानकांजवळ ‘ब्रिथ अनालायझर अल्कोहोल मशीन’ च्या माध्यमातून तपासणी करणे सुरू केले आहे. त्यामुळे बस चालकांनो सावधान मद्यपान करून बस चालवाल तर कार्यवाही करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

दोन वर्षांपासून महामार्गाचे भिजत घोंगडे

        भंडारा बालाघाट या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळून दोन वर्षे लोटले. मात्र अजूनही बांधकामाला सुरुवात झाली नाही. वाहनांच्या वरदळी मुळे व अरुंद रस्त्यामुळे अपघाताची मालिका सुरूच असून त्यात भर पडली ती रस्त्यावरील जीवघेणे खड्डे. मागील आठवड्यात याच्या प्रत्यय दिसून आला. अपघातात नाहक बळी जात आहेत. वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रवासी नागरिक धोका पत्करून प्रवास करीत आहेत. एवढे होत असताना देखील प्रशासन व लोकप्रतिनिधी चुकती साधून आहेत. दोन वर्षांपासून भंडारा बालाघाट राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले असून सरकारच्या रस्त्याबाबतचा दावा फोल ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *