महाराष्ट्र हेडलाइन

वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर यांचे स्वागत

Summary

गडचिरोली प्रतिनिधी आज दि. ९/३/२१ रोजी वनसंरक्षक मा. डॉ्. किशोर मानकर IFS गडचिरोली यांचे दालनात कास्टाईब वन कर्मचारी संघटना जिल्हा गडचिरोली चे वतीने सदिच्छा भेट घेवून त्यांची गडचिरोली वनसंरक्षक पदी पदस्थापना झाल्याने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. व ओझारती चर्चा […]

गडचिरोली प्रतिनिधी
आज दि. ९/३/२१ रोजी वनसंरक्षक मा. डॉ्. किशोर मानकर IFS गडचिरोली यांचे दालनात कास्टाईब वन कर्मचारी संघटना जिल्हा गडचिरोली चे वतीने सदिच्छा भेट घेवून त्यांची गडचिरोली वनसंरक्षक पदी पदस्थापना झाल्याने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. व ओझारती चर्चा करण्यात आली. या मध्ये वनसंरक्षक डॉ.मानकर यांनी कर्मचारी आपले कर्त्यव्य करीत असताना निर्भीड, निस्वार्थाने करावी. वन सेवा करण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात.त्यासाठी सर्वानी योग्य पद्धतीने आपले कर्तव्य पार पाडावे.गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा असून या जिल्यातील उपेक्षित घटकासाठी कार्य करून योग्य प्रवाहात आणावे.किंबहुना इथल्या उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना अपेक्षित सोई मिळवून देणे हे ध्येय ठेवून कर्मचाऱ्यांचे हक्क व अधिकार वेळीच मिळवून देण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून करून सहकार्य करावे असे आवाहनही वनसंरक्षक डॉ मानकर यांनी केले.
संघटनेच्या शिषटमंडळात जिल्हाध्यक्ष प्रभाकर सोंनडवले , कार्याध्यक्ष नामदेव बन्सोड, उपाध्यक्ष रमेश घुटके, महासचिव सिद्धार्थ गोवर्धन, प्रसिध्दी प्रमुख विनोद धात्रक, गडचिरोली विभागाचे सचिव धम्मराव दुर्गमवार,सदस्य जितेंद्र सोरदे, आलापल्लीचे भारत निमगडे , वडसाचे विजय कंकलवार, भामरागड चे भास्कर खोब्रागडे, कार्य आयोजन विभागाचे अमित दनडेवर इत्यादी हजर होते. संचालन व आभार सिद्धार्थ गोवर्धन महासचिव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *