महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

वक्फ मंडळाच्या मालमत्तेवरील अतिक्रमणाबाबत अहवाल सादर करा – अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे

Summary

मुंबई, दि. २३ : परभणीसह राज्यातील वक्फ मंडळाच्या मालमत्तेवर अतिक्रमण व बेकायदेशीर व्यवहार होत असल्याच्या तक्रारींची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. मंत्रालयात आयोजित बैठकीत आशुरखाना नाले हैदर (परभणी), हजरत मोहम्मद […]

मुंबई, दि. २३ : परभणीसह राज्यातील वक्फ मंडळाच्या मालमत्तेवर अतिक्रमण व बेकायदेशीर व्यवहार होत असल्याच्या तक्रारींची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत.

मंत्रालयात आयोजित बैठकीत आशुरखाना नाले हैदर (परभणी)हजरत मोहम्मद हनीफ मस्तान रहेमान सैलानी (वाशिम)पीर साहेब सय्यद रहिमुद्दीन दर्गाह ट्रस्ट (उरण) आणि ईदगाह व्यवस्थापन कमेटी (लातूर) या वक्फ संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सचिव रूचेश जयवंशीमुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सिंहअवर सचिव मिलिंद शेनॉयतहसिलदार संदीप राजपुरे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले कीवक्फ मंडळाच्या जागांवर अतिक्रमण आढळल्यास प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर योग्य ती कारवाई करावी. जागेवरील दुकाने अथवा मालमत्तांचे संपुष्टात आलेले भाडेकरार नव्याने करण्यात यावेत. संबंधित महानगरपालिका किंवा नगरपालिका यांना याबाबत सूचना द्याव्यात.

तसेच वक्फ संस्थांमधील गैरव्यवहारांबाबत तक्रारींची चौकशी करून अहवाल पुढील दहा दिवसांत सादर करण्याचेही आदेश श्री. भरणे यांनी दिले.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *