वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची ४मार्चला साकोली येथे जाहिर सभा
लाखांदूर :- वंचित चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा ४ मार्चला भंडारा जिल्हा दौरा असुन वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा साकोली येथील पटाची दान एकोडी रोड येथे ४ मार्च २०२४ ला दुपारच्या २ वाजताच्या सुमारास आदिवासी बहुजन अधिकार महासभा आयोजित करण्यात आली असून या सभेला ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत. जल ,जंगल जमिनिचे सरंक्षण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी समाजाला त्यांच्या संविधानिक हक्क व अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. आदिवासी समाजाचे हक्क व अधिकार जरी भारतीय संविधानात सुरक्षित असले तरी त्यांची अंमलबजावणी शासन करतांना दिसत नाही हे मात्र उदाहरण आहे. आदिवासी समाजाच्या अधिकार्यांना बळ देण्यासाठी व वन हक्क कायदा २००६ पारीत करण्यात आला मात्र त्याची अंमलबजावणी व जनजागृती होत नाही. त्यातच आदिवासी समाजाचा हक्क वगळून जल,जंगल जमीन मोठ मोठ्या उघोगपतिच्या ताब्यात देण्याचे हे सरकार करीत आहे. शैक्षणिक अधिकारांपासून आदिवासी समाज काही प्रमाणात प्रगतीपथावर आहे. जात प्रमाणपञ, जात वैधता प्रमाणपत्र, आरक्षण असे विविध प्रकारचे कारणे पुढे करीत या समाजात उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे कट कारस्थान हे सरकार करीत आहे. आदिवासी, ओबीसी समाजाच्या अधिकार्यांना बळ देण्यासाठी आदिवासी बहुजन अधिकार महासभा होणार असून जास्तीत जास्त संख्येने एस सी, एसटी, ओबीसी व मायनॉरिटी या जनतेने सभेला उपस्थित राहावे असे आवाहन भंडारा_गोंदिया जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी चे सर्व पदाधिकार् यांनी केले आहे.