महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध

Summary

मुंबई, दि. 28 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील पाच मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.             मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे […]

मुंबई, दि. 28 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील पाच मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

            मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : नागपूर- 53 पैकी 26, भंडारा-गोंदिया- 40 पैकी 22, गडचिरोली-चिमूर- 12 पैकी 12, चंद्रपूर- 35 पैकी 15 आणि रामटेक लोकसभा मतदार संघात 41 पैकी 35 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

            पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 30 मार्च 2024 ही असून या मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होईल.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *