नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

लोकशाहीच्या महा उत्सवात प्रत्येकाने मतदानाच्या रुपाने योगदान द्यावे!!! प्राचार्य सुधीर बुटे लोकशाही मजबूत करण्यासाठी 100% मतदान करा

Summary

(काटोल)कोंढाळी-वार्ताहर- भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. देशातील प्रत्येक मतदाराला मतदानाचा अधिकार आहे आणि प्रत्येक मतदाराने मतदान केलेच पाहिजे.असे आवाहन प्राचार्य सुधीर बुटे यांनी सोमवार 08 एप्रिल रोजी येथील लाखोटिया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात लोकसभा निवडणूक-2024 च्या […]

(काटोल)कोंढाळी-वार्ताहर-

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. देशातील प्रत्येक मतदाराला मतदानाचा अधिकार आहे आणि प्रत्येक मतदाराने मतदान केलेच पाहिजे.असे आवाहन प्राचार्य सुधीर बुटे यांनी सोमवार 08 एप्रिल रोजी येथील लाखोटिया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात लोकसभा निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर जेष्ठ नागरिक मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आवहन करण्यासाठी
नागपूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या सूचनेवरून शालेय शिक्षण विभाग, नगरविकास विभाग, महसूल विभाग व ज्येष्ठ नागरिक संघ व लखोटिया भुतडा कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाखोटीया ‌भुतडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर बुटे यांनी काटोल तहसील ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव गजानन भोयर, काटोलचे बीईओ नरेश भोयर, महसूल विभागाचे सूरज सददकर, लाखोटिया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर बुटे, शिक्षण केंद्र अधिकारी निळकंठराव लोहकर आदी नी उपस्थितांना मार्गदर्शन केले . लोकशाहीच्या बळकटीसाठी, गणतांत्रीक गणराज्याच्या लोकशाहीच्या महान बलिदानासाठी, प्रत्येकजण 100% मतदान करावे असे
उपस्थित ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यी व पालक यांना प्राचार्य सुधीर बुटे यांनी संबोधित करून मार्गदर्शन केले.
बीईओ नरेश भोयर म्हणाले की, निवडणुकीत मतदारांनी प्रलोभनापासून दूर राहून विचारपूर्वक मतदान करणे बंधनकारक आहे. लोकशाहीत प्रत्येक मताला ताकद असते. मतदान हा सर्वात शक्तिशाली अधिकार आहे. मतदानाचा वापर करूनच मजबूत राष्ट्राचा पाया रचला जाऊ शकतो. ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सचिव गजानन भोयर यांनीही शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे काटोल तहसील अध्यक्ष- रमेश तिजारे, सचिव- गजानन भोईर, तसेच जिल्हापरिषद सदस्य पुष्पाताई चाफले, पंचायत समिती सदस्य अरुण उईके, लताताई धारपुरे, कोंढाळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष रामदास सहारे, वासुदेवराव जामगडे, केशवराव राऊत
पाटील, दुर्गा प्रसाद पांडे प्रसाद पांडे, प्रमोद चाफले, उपप्राचार्य कैलास थुल, परीक्षा प्रमुख प्रिया धारपुरे, सुरेंद्र भाजीखाये,
नगरपंचायतचे, पावन वैद्य,
नंदकिशोर पैठे, विजय गेडाम ,वंदना जयपूरकर, पुरूषोत्तम ईखार ,सौरभ उमरेकर, तसेच शेकडो ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना दुर्गा ताई भट्ट यांनी शासनाच्या या अभियानाचे कौतुक केले व लोकशाही बळकट करण्यासाठी हे अभियान नक्कीच मैलाचा दगड ठरेल असेही सांगितले. लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदारांनी विचारपूर्वक मतदान करणे गरजेचे आहे, जेणेकरून लोकशाहीचा पाया मजबूत होईल. 100 टक्के मतदानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी ज्येष्ठ नागरिक, पालक आणि विद्यार्थिनींना केले. यावेळी सुरेंद्र भाजीखाये म्हणाले की, मतदानाचे महत्त्व समजावून सांगणारी मोहीम लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी फलदायी ठरेल. यासह, विद्यार्थिनींनी स्वत:साठी, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी आणि शेजारी राहणाऱ्या मतदारांसाठी निष्पक्ष मतदानाची शपथ घेतली. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून या मोहिमेच निवडणूक विभागाप्रमाणे मतदारांना माहितीसाठी जनजागृती पत्रकांचेही वाटप केले. याशिवाय ज्येष्ठ नागरिक, पालक व विद्यार्थिनींनाही मतदान करण्यासाठी व करवून घेण्यासाठी शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गा ताई भट्टड व आभार अनंत बुरहान यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *