लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे कार्यालय बंद पाडण्यात वरठी पोलीस यशस्वी
प्रतिनिधी वरठी
वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत आंबेडकर वॉर्ड, वरठी येथे अमर कॉम्प्युटर सेंटर या नावाने लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे कार्यालय आहे. संघटनेच्या प्रस्तुत कार्यालयाचे कारभार लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे प्रदेश महासचिव अमर भालचंद्र वासनिक पाहतात. संघटनेचे मुख्य कार्यालय हे आंबेडकर वॉर्ड, ई एल चर्च रोड, भंडारा येथे प्रदेशाध्यक्ष नयन ताराचंद शेंडे बघत असतात.
वरठी पोलीस स्टेशन चे तत्कालीन ठाणेदार सुनील ढोबाले, स्वर्गवासी ठाणेदार सुधाकर चव्हाण, तत्कालीन हेड कॉन्स्टेबल गुलाब भोंदे, तत्कालीन ठाणेदार ताजने, तत्कालीन ठाणेदार निशांत मेश्राम, यांच्या भ्रष्टाचार प्रकरणावर अमर वासनिक यांनी पत्रव्यवहार केल्याने या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या. तसेच वर्तमान स्थितीतील ठाणेदार अभिजित पाटील यांच्या भ्रष्टाचार संदर्भात अमर वासनिक यांनी लावलेला माहितीचा अधिकार आणि दिनांक २३-१०-२०२३ रोजी प्रथम अपिलीय माहिती अधिकारी मा. श्री. ईश्वर कातकडे, एस. पी. कार्यालय भंडारा यांनी माहिती अधिकार अर्ज प्रथम अपिलाचे दिलेले तीन जजमेंट अपील क्र. २७/२०२३, अपील क्र. ३१/२०२३, अपील क्र. २८/२०२३ दिनांक ०३-११-२०२३ रोजी डीवायएसपी डॉ. अशोक बागुल, ठाणेदार अभिजित पाटील आणि अपीलार्थी अमर वासनिक यांना लिखित स्वरूपात प्राप्त; प्रस्तुत अपिलाचे आदेश अपीलार्थी अमर वासनिक यांना मान्य नसल्यास ९० दिवसांचे आत राज्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग, खंडपीठ नागपूर, प्रशासकीय इमारत क्र. २, सिव्हिल लाईन, नागपूर यांच्याकडे कलम १९(३) अन्वये द्वितीय अपील दाखल करता येईल अशी प्रथम अपिलीय अधिकारी मा. श्री. ईश्वर कातकडे यांची अपिलार्थी अमर वासनिक यांना देण्यात आलेली सूचना; संबंधित पोलीस अधिकारी यांचा तसेच आपला भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून ग्राम वरठी येथील ठाणेदार अभिजित पाटील यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांची घेतलेली मदद; तसेच लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे प्रदेश महासचिव अमर वासनिक यांच्यावर गांजा तस्कर यांनी दोन लोखंडी धारदार शस्त्रांनी केलेला प्राणघातक हल्ला तसेच दिनांक १४-११-२०२३ रोजी लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे कार्यालय अमर कॉम्प्युटर सेंटर ची गांजा तस्कर तसेच ड्रग्स माफिया यांनी वेळ सायंकाळ ०५:२५ वाजता केलेली तोडफोड; तसेच दिनांक १४-११-२०२३ रोजी अमर वासनिक हे रात्री १०:२० वाजता वरठी पोलीस स्टेशन येथे उपस्थित असताना अमर वासनिक यांचे वडील भालचंद्र वासनिक यांच्या निवासस्थानावर येऊन ड्रग्स माफिया ने तब्बल २० मिनिटे केलेली तोडफोड. डी.वाय.एस.पी डॉ अशोक बागुल यांची अपिलार्थी अमर वासनिक यांनी पोलीस स्टेशन वरठी येथील माहितीचे निरीक्षण करू नये म्हणून केलेली प्रतिबंधात्मक कार्यवाही. एस.डी.पि.ओ. कार्यालयातील पोलीस जन माहिती अधिकारी चंदू भेंडारकर यांनी ब्लॉक केलेले अपिलार्थी अमर वासनिक यांचे भ्रमणध्वनी क्रमांक;
पोलीस स्टेशन वरठी येथील पोलीस अधिकारी राकेश बोरकर हे भंडारा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असूनही यांनी आपले काके भाऊ विक्की साहुकार उर्फ विक्की अशोक गणवीर याला दिलेले अभयदान; आणि काल दिनांक ०३-१२-२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता आंबेडकर वॉर्ड, वरठी येथील लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे कार्यालय अमर कॉम्प्युटर सेंटर समोर प्रदेश महासचिव अमर भालचंद्र वासनिक यांना विक्की साहुकार ने जिवे मारण्याची धमकी देऊन होशोआवाज मध्ये घातलेला धिंगाणा. या सगळ्या घटनांना वरठी पोलीस स्टेशन चे ठाणेदार अभिजित पाटील हे जिम्मेदार असून परिणामतः आंबेडकर वॉर्ड, वरठी येथील लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे कार्यालय अमर कॉम्प्युटर सेंटर ला बंद करण्यात वरठी पोलीस हे यशस्वी झाले आहेत. यावर सामाजिक कार्यकर्ता अमर वासनिक हे मंत्रालयातून दाद मागत असून जर लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे कार्यालय असेच बंद राहिल्यास सामाजिक कार्यकर्ते अमर वासनिक हे वरठी पोलीस स्टेशन समोर बेमुदत आमरण उपोषणावर बसतील असा इशारा प्रदेश महासचिव अमर वासनिक यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.