महाराष्ट्र मुंबई राजकीय हेडलाइन

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे जीवनकार्य आमच्यासाठी आदर्श व मार्गदर्शक – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन तथा सामाजिक न्याय दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

Summary

मुंबई, दि. 25 : लोककल्याणकारी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे जीवनकार्य आमच्यासाठी व सामाजिक न्याय विभागासाठी आदर्शवत, प्रेरणादायी तसेच मार्गदर्शक आहे, अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले […]

मुंबई, दि. 25 : लोककल्याणकारी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे जीवनकार्य आमच्यासाठी व सामाजिक न्याय विभागासाठी आदर्शवत, प्रेरणादायी तसेच मार्गदर्शक आहे, अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. तसेच यानिमित्त साजऱ्या केल्या जात असलेल्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्य सरकारच्या वतीने यावर्षी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराजांनी लोक कल्याणासाठी घेतलेले विविध निर्णय, त्यांची दूरदृष्टी स्पष्ट करणारी कामे, संस्कृती, शिक्षण, कौशल्य विकास, क्रीडा आदी क्षेत्रात दिलेले योगदान तसेच बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर केलेले प्रयत्न या सर्व कार्याचे स्मरण प्रत्येक जिल्ह्यातून राज्य सरकारच्या वतीने विविध उपक्रमांद्वारे करण्यात येत असून, समाज माध्यमांवर देखील #लोकराजाशाहू व #सामाजिकन्यायदिन हे रॉन हॅशटॅग वापरून विशेष अभिवादन करण्यात येत आहे.

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त व्यसनमुक्तीची शपथ व संदेश

दि. 26 जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून धनंजय मुंडे यांनी व्यसनमुक्ती साठी शपथ बद्ध व्हावे असे संदेश तरुणाईला दिला आहे. कोरोनाच्या कठीण काळात शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्याचे आव्हान आपल्या समोर असताना आपण निरोगी व सदृढ राहण्यासाठी 100% व्यसन मुक्त असणे गरजेचे आहे. त्यामुळे तरुणाईने आजच्या दिनाचे औचित्य साधून व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प करावा असे आवाहन सामाजिक न्याय मंत्री श्री.मुंडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *