लोकप्रिय खासदार डॉक्टर नामदेव कीरसान थेट शेतकऱ्यांच्या बांधावर: शेतकऱ्यांशी संवाद साधून पुरामुळे झालेल्या नुकसान ग्रस्त भागाची केली पाहणी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश
Summary
चिमूर, जि. चंद्रपूर :: दि. 6 सप्टेंबर 2025, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव कीरसान यांनी चिमूर तालुक्यातील खडसंगी, रेंगाबोडी, चिचघाट, जामणी, आमडी, खुरसापार, खापरी, बोथली, खाणगाव सावरी, वाहनगाव या गावांना भेट देऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पुरामुळे झालेल्या […]

चिमूर, जि. चंद्रपूर :: दि. 6 सप्टेंबर 2025, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव कीरसान यांनी चिमूर तालुक्यातील खडसंगी, रेंगाबोडी, चिचघाट, जामणी, आमडी, खुरसापार, खापरी, बोथली, खाणगाव सावरी, वाहनगाव या गावांना भेट देऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.
शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची व्यथा खासदारांसमोर मांडली. यावेळी डॉ. किरसान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पुरामुळे व आजपासच्या नुकसान ग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच शेतमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा ठोस पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.
या पाहणी दौऱ्यात चिमूर तहसीलदार श्रीधर राजमाने, गटविकास अधिकारी फुलजारे यांच्यासह तालुक्यातील संबंधित तलाठी, कृषी सहाय्यक, ग्राम विकास अधिकारी उपस्थित होते.
यावेळी चिमूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विजय पा. गावंडे, जिल्हा सरचिटणीस गजानन बुटके, विजय झाडे, प्रतिक ढोक, बंडू मेश्राम, सुनील गुळघे, विनोद देठे, चंदाताई कारेकार, इरफान पठाण, दत्ताजी देहारे, नंदूजी नागोसे, साहिल कुरेशी, रुपचंद सहस्त्रर, बबन कुबडे, रामाजी शेंडे, तेजराम झाडे, भारत नन्नावरे, विठ्ठल रणदिवे, प्रफुल दरे, उदयभान राऊत, कुणाल रामटेके, गजानन घानोडे, सुभाष काळेकर, टिपलेश्वर निखाडे, प्रशांत कोल्हे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष नागेंद्र चुट्टे, अमोल नागोसे यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी व शेतकरी उपस्थित होते.
पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
गडचिरोली चामोर्शी
गजानन पुराम
मो. 7057785181