लॉयन्स ऑक्टोबर सेवा सप्ताह 2021अंतर्गत विद्यार्थ्यांची दंत तपासणी व मुख कर्करोगाचे दुष्परिणाम या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन संपन्न…!!
Summary
मानवी शरीरातील इतर आवश्यक अवयवापैकी एक अवयव म्हणजे दात. दातांची योग्य प्रकारे काळजी व स्वछता न केल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात,या समस्येचे भान ठेवून लॉयन्स क्लब,गडचिरोलीच्या पुढाकाराने व वेद मल्टीस्पेशालिस्ट डेंटल क्लिनिक,गडचिरोली यांच्या सहकार्याने दिनांक 5 ऑक्टो. 2021 रोज मंगळवारला […]
मानवी शरीरातील इतर आवश्यक अवयवापैकी एक अवयव म्हणजे दात. दातांची योग्य प्रकारे काळजी व स्वछता न केल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात,या समस्येचे भान ठेवून लॉयन्स क्लब,गडचिरोलीच्या पुढाकाराने व वेद मल्टीस्पेशालिस्ट डेंटल क्लिनिक,गडचिरोली यांच्या सहकार्याने दिनांक 5 ऑक्टो. 2021 रोज मंगळवारला शालेय विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी व मुख रोग तपासणी ,शहरातील नामवंत दंत चिकित्सक डॉ.प्रांजली आईचंवार व डॉ. निवेदिता निशाणे यांच्या मार्फत करण्यात आली.
*सत्र दुसरे*
*तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाविरोधात आणि मुख कर्करोगाचे दुष्परिणाम करिता केली जनजागृती*
महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यात तंबाखू जन्य पदार्थांचे सेवन अतिशय जास्त प्रमाणात आहे,हे जाणून उपक्रमाच्या दुसऱ्या सत्रात तंबाखू जन्य पदार्थाचे दुष्परिणाम याविषयावर डॉ.प्रांजली आईचंवार यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांकडून तंबाखू जन्य पदार्थ आम्ही सेवन करणार नाही अशी शपथ घेण्यात आली. वसंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ह्या शिबिराचा लाभ घेतला.यावेळी वसंत विद्यालयाचे मुखाध्यापक शेमदेव चापले, शिक्षकवृंद चहांदे,काटेंगे आणि करोडकर मॅडम उपस्थित होते तसेच लॉयन्स क्लब च्या अध्यक्षा लॉ.परविन भामानी, सचिव लॉ. मंजुषा मोरे, लॉ.नादिरभाई भामानी,डॉ. सुरेश लड़के, लॉ. मनोज ठाकुर ,लॉ. शालिनी कुमरे, लॉ. रहीम दोढिया ,लॉ. शेमदेव चापले, लॉ. प्रभु सादमवार, लॉ. गिरिश कुकडपवार, लॉ.दीपक मोरे, लॉ. सुचिता कामडी आदी सदस्य उपस्थित होते.
शेषराव येलेकर
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी