लॉकडाऊन वाढविल्यास लगतच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यातून सूट देण्यात यावी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी
सध्या महाराष्ट्रात सुरू असलेला लॉक डाऊन 15 मे पासून 30 मे पर्यंत वाढविण्याचा महाराष्ट्र शासनाचा विचार सुरू आहे. सध्या शेतीचा हंगाम ऐन ऐरणीवर असल्यामुळे लॉक डाऊन 15 ते 30 मे तसेच त्या पुढे वाढविल्यास तो लगतच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा नुकसानीचा ठरणार आहे म्हणून लगतच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यातून सूट देण्यात यावी अशी मागणी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी करीत आहे.
विदर्भात टोबनी/ पेरणीचा हंगाम जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतो. यासाठी सध्या जमिनीची मशागत करणे, खते व बियाण्यांची खरेदी करणे ही सर्व कामे मे महिन्यातच करावी लागते बऱ्याच शेतकऱ्यांची शेतं लगतच्या जिल्ह्यात आहे. परंतु लॉक डाऊन लागल्यामुळे अशा शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यास मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहे. 15 ते 30 मे किंवा त्यापुढे लाकडं वाढवल्यास लगतच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यास मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात ऐन हंगामाच्या काळात लॉक डाऊन वाढविल्यास शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे पुढे लॉक डाऊन वाढविल्यास शेतकऱ्यांना यातून सूट देण्यात यावी अशी मागणी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य निर्णय घ्यावा अशी शेतकऱ्यांकडून शासनाला विनंती करण्यात येत आहे.
गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा. शेषराव येलेकर